घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

काश्मीरमध्ये कुरिअरने होतेय दहशतवाद्यांना फंडिंग; पाकिस्तानी संघटनेचा डाव, एसआयएकडून पर्दाफाश

Subscribe

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुर्रियत नेते मोहम्मद अश्रफ यांचा श्रीनगरमधील बारजुला आणि मुश्ताक अहमद वानी यांचा नादीरगुंड पीरबाग येथे झडती घेण्यात आली. कुपवाडा येथील दरधारी करालपोरा येथील मोहम्मद सईद बट, बारामुल्लाच्या पट्टण येथील अरपोरामधील मुझफ्फर हुसेन बट यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली, परंतु एसआयएने त्यांच्या नावांची पुष्टी केलेली नाही.

नवी दिल्ली – काश्मीरमधील दहशतवादी कारवायंना पैसे पुरवण्याकरता आयएसआयने (ISI) वापरलेल्या नव्या क्लृप्तीचा राज्य तपास यंत्रणेने (State Investigation Agency) पर्दाफाश केला आहे. ISIडून काश्मीरमधील दहशतवाद्यांना कॅश कुरिअरने (Cash Courier for terror Funding) पैसे पाठवले जात होते. तसंच, पकडले जाऊ नये याकरता १०-२० हजार अशी लहान रक्कम कुरिअर केली जात होती, अशी माहिती SIAला मिळाली आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेत SIAला ही माहिती प्राप्त झाली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून, SIA ने शनिवारी पाच जिल्ह्यांमध्ये हुर्रियत नेत्याच्या घरासह 12 ठिकाणी झडती घेतली आणि मोबाईल फोन, सिमकार्ड, बँक दस्तऐवज, आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही डायरी याशिवाय २९ लाख रुपये जप्त केले.

हेही वाचा – देशभरातील 340 महिला अग्निवीरांचा पुढच्या वर्षी होणार नौदलात समावेश

- Advertisement -

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुर्रियत नेते मोहम्मद अश्रफ यांचा श्रीनगरमधील बारजुला आणि मुश्ताक अहमद वानी यांचा नादीरगुंड पीरबाग येथे झडती घेण्यात आली. कुपवाडा येथील दरधारी करालपोरा येथील मोहम्मद सईद बट, बारामुल्लाच्या पट्टण येथील अरपोरामधील मुझफ्फर हुसेन बट यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली, परंतु एसआयएने त्यांच्या नावांची पुष्टी केलेली नाही.

एसआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोर, श्रीनगर आणि बडगाममधील दहशतवादी नेटवर्कशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या घटकांच्या घरांची झडती घेण्यात आली. श्रीनगरच्या टाडा-पोटा कोर्टातून त्यांना सर्च वॉरंट मिळाले होते. एसआयएला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलबदर ही दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या सहकार्याने काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवादी नेटवर्कच्या मदतीने दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारत होती. बँक व्यवहार आणि कॅश कुरिअरद्वारे हे पैसे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवले जात होते.

- Advertisement -

हेही वाचा – इंडोनेशियन सुपारी तस्करी प्रकरणी ईडीची राज्यात 17 ठिकाणी छापेमारी 16 लाखांची रोकड जप्त

दहशतवादी संघटनांनी काश्‍मीरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अशी यंत्रणा तयार केल्याचे तपासात समोर आले. तसंच, अनेक दहशतवाद्यांनी खोऱ्यातील विविध भागात आपले स्लीपर सेलही तयार केले आहेत, ज्यांचे काम केवळ दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांसाठी पैसा पुरवणे आहे. दहशतवादी कारवायांना वेग देण्याबरोबरच स्थानिक तरुणांना दहशतवादी बनवण्यासाठीही हा पैसा खर्च केला जातो.

एसआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, एसआयएने पोलीस आणि सीआरपीएफ कर्मचार्‍यांसह डझनभर स्वतंत्र पथके तयार केली आणि एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचा शोध घेण्यात आला. यादरम्यान संबंधितांची चौकशीही करण्यात आली आहे. झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेव्यतिरिक्त अनेक बँक पासबुक, चेकबुक इत्यादी व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांचे मूल्यमापन केले जात असून त्याआधारे तपास पुढे नेण्यात येईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -