घरCORONA UPDATEलॉकडाऊन किस्सा: 'वरा'कडील ४० नातेवाईकांचा, ४८ दिवस 'वधू'कडे मुक्काम, खर्चकरून वधूचे वडिल...

लॉकडाऊन किस्सा: ‘वरा’कडील ४० नातेवाईकांचा, ४८ दिवस ‘वधू’कडे मुक्काम, खर्चकरून वधूचे वडिल हैराण!

Subscribe

आपल्याकडे लग्नात आलेल्या वर पक्षाकडील नातेवाईकांचे आगत्याने स्वागत करायची पध्दत आहे. पूर्वी लग्नानंतर एख दिवस वराकडील मंडळी वधूच्या घरी राहत असे. पण जसजसा काळ बदलला तशी ही प्रथा ही बंद झाली. आता लग्नाच्या दिवशीच वरपक्ष वधूला घेऊन जातात. पण लॉकडाऊनच्या काळात या वधूपक्षाने वर पक्षाकडे ठांडच मांडला असं दिसतय. पटनामध्ये झालेल्या एका लग्नातील वधूपक्षाला लॉकडाऊनमुळे एक दोन नाही तर तब्बल ४० दिवस वधूकडे रहावं लागलं. याचा सगळा खर्च वधूपक्षाला करावा लागला.

२१ मार्चला कोलकत्त्याहून मोहम्मद असलम आणि नातेवाईक वधूकडे पटनाला आले. २२ तारखेला त्यांचे परत जाण्याचे तिकीट होते. २२ मार्चला लग्न पार पडलं, आणि संध्याकाळी लॉकडाऊनमुळे ट्रेन कॅन्सल झाली. आणि नवऱ्या मुलाला आपल्या ४० नातेवाईकांसह मुलीच्या घरीच रहावं लागलं. मुलीच्या वडिलांना या ४० लोकांची खाण्याची आणि राहण्याची सोय करावी लागली. शेवटी पाच – पाच जणांना एका नातेवाईकाकडे वडिलांनी सोय केली.

- Advertisement -

नवऱ्या मुलीचे वडिल प्रशासनाकडे वराला परत पाठवण्याबाबत सतत आग्रह करत होते. शेवटी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण वधू मंडळीची कोरोना चाचणी केली. त्यांची खाण्या पिण्याची सोय करून त्यांना कोलकत्यासाठी बस उपलब्ध करून दिली.

४८ दिवसांनंतर कोलकत्त्यात परतले

शेवटी लग्नानंतर ४८ दिवसानंतर वधू आणि वर आपल्या घरी कोलकत्त्याला पोहचले. ४८ दिवसांनंतर परतल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला. नवरा- नवरी पण प्रचंड खूष होते.

- Advertisement -

हे ही वाचा – गावात पुरूषांना प्रवेशच नाही, इथे आहे महिला राज…वाचा कुठे आहे हे गाव!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -