घरताज्या घडामोडीभारतात कोरोना लसीचे निर्मिती करा, मोदींचे 'UNGA'मध्ये जगभरातील लस निर्मिती कंपन्यांना आवाहन

भारतात कोरोना लसीचे निर्मिती करा, मोदींचे ‘UNGA’मध्ये जगभरातील लस निर्मिती कंपन्यांना आवाहन

Subscribe

भारताचे वैज्ञानिक कोरोनाची एका नेजल वॅक्सिनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लस उत्पादक कंपन्यांना भारतात लस निर्मिती करण्याचे आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेतून (UNGA) पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधत होते यावेळी मोदींनी जगभरातील कंपन्यांना आवाहन केलं आहे. भारतात कोरोना लसीचं उत्पादन वेगाने करण्यात येत असून जगभरातील गरजू देशांना पुन्हा कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यासाठी सुरुवात केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच भारतात कोरोना लसीकरण करण्यामध्ये देशातील डॉक्टर, तज्ञ, वैज्ञानिक, संशोधक यांचा मोठा वाटा असून त्यांचे देखील मोदींनी आभार संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मानले आहेत. भारतामध्ये १८ वर्षांखालील मुलांसाठीची लस अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधत होते. (UNGA PM Modi PM Modi speech) यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, सेवा परमो धर्मवर जगणारा भारत, अपुऱ्या संसाधाने असतानाही कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मितीसाठी अपार मेहनत घेतली. मी युएनजीला सांगू इच्छितो की, भारताने जगातील पहिली डीएनए वॅक्सिन तयार केली आहे. ज्या वॅक्सिनला १२ वर्षांवरील सर्व लोकांना देण्यात येऊ शकतो. तसेच आणखी एक एमआरएनए वॅक्सिन निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. भारताचे वैज्ञानिक कोरोनाची एका नेजल वॅक्सिनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे. भारताने पुन्हा एकदा जगभरातील लसीसाठीच्या गरजू देशांना वॅक्सिन देण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

भारतात यावं आणि लसींची निर्मिती करावी

जगभरातील लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना मी आवाहन करतो आहे की, त्यांनी भारतात यावं आणि लसींची निर्मिती करावी. मानवी जीवनात तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग करण्यात येत आहे. परंतु येत्या काळात तंत्रज्ञानसह लोकशाही सुनिश्चित करणं आवश्यक आहे. भारतीय वंशाचे डॉक्टर, इंजिनियर, वैद्यकीय तज्ञ, मॅनेजरसह अन्य लोकं जगातील कोणत्याही कोपऱ्यात असले तरी भारताप्रति त्यांच्या संवेदना कायम आहेत. हे कोरोना काळात आपण पाहिले आहे. भारताने जगाला कोरोना काळात व्यवस्थापनाविषयी नवा धडा शिकवला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

३ करोड लोकांना पक्की घरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्याना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या परिवाराप्रति संवेदना भाषणाच्या सुरुवातीला व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, मागील ७ वर्षाच्या काळात भारतामध्ये ४३ मिलियनपेक्षा अधिक लोक बँकेशी जोडले गेले आहेत. ज्यांचा यापुर्वी बँकेशी काहीही संबंध नव्हता. तसेच ३७ करोड लोकांना बीमा सुरक्षा कवच मिळाला असून यांच्याकडे पहिला बीमा सुरक्षा कवच नव्हते. भारतात ५० लाख लोकांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करत आहे. भारतात मागील ७ वर्षांत ज्यांच्याकडे पक्के घरे नव्हती अशा ३ करोड लोकांना पक्की घरे बांधून त्यांच्या नावावर करण्यात आली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

६ लाखांपेक्षा अधिक गावात ड्रोनने मॅपिंग

मोदींनी पुढे म्हटलं आहे की, भारतासह जगभरात प्रदुषित पाण्याची समस्या गहन आहे. भारतातील समस्या सोडवण्यासाठी पाईपलाईनद्वारे प्रतिषित पाणी असलेल्या जागी पाणी पोहचवण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे. जगभरातील मोठ्या संस्थांनी मानले आहे की, कोणत्याही देशाच्या विकासासाठी जमीन आणि घराचे अधिकाराचा रिकॉर्ड असने अनिवार्य आहे. भारतात मोठ्या संख्येने अशी लोकं आहेत. ज्यांच्याकडे जमीन आणि घरांचे अधिकार नाही. ६ लाखांपेक्षा अधिक गावात ड्रोनने मॅपिंग करुन घर आणि जमिनीटा डिजिटल रिकॉर्ड निर्माण केला आहे. हा रिकॉर्ड बँकेंना कर्ज देण्यास आणि मालमत्तेवरुन असलेला वाद मिटवण्यासाठी कामी येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएनजीएमध्ये सांगितले.

भारताच्या प्रगतीमुळे विश्वाची प्रगती

भारतात प्रगती झाल्यास जगभरात प्रगती होते. व्हेन इंडिया रिफर्म्स वर्ल्ड ट्रान्सफर असे मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रज्ञान विश्वाची मदत करु शकते. भारतात सुरु केलेल्या युपीआय पेमेंट इंटरफेसचा मोठा फायदा झाला असून आता महिन्याला ३५० करोड रुपयांची देवाणघेवाण होत आहे. कोविन अॅप या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे देशात कोरोना लसीकरण करण्यास मोठा हातभार लागला असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे.


हेही वाचा : Narendra Modi in US : पंतप्रधान मोदींचा दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकला थेट इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -