घरदेश-विदेशनवीन संसद भवनाचे उद्घाटन; शंकराचार्य, महान विद्वान, पंडित, संत राहणार उपस्थित

नवीन संसद भवनाचे उद्घाटन; शंकराचार्य, महान विद्वान, पंडित, संत राहणार उपस्थित

Subscribe

 

नवी दिल्लीः नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुरमुर यांच्या हस्ते करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या मागणीसाठी विरोधकांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयातही यासाठी याचिका दाखल झाली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना लोकसभा सचिवालयाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

यातील धक्कादायक बाब म्हणजे कार्यक्रमात राष्ट्रपती, उप राष्ट्रपती यांच्या संदेशाचे वाचन उपसभापती हरिवंश करणार आहेत. सकाळी साडेसात वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमात तामिळनाडूच्या मठातील २० स्वामी, संत उपस्थित राहणार आहेत. शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत कार्यक्रमात असतील. कार्यक्रमात खास प्रार्थना होणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर दुपारी अडीच वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते मलिल्कार्जुन खरगे यांचेही भाषण होणार आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा मंजूर झालेला नाही. तसेच कॉंग्रेसने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे खरगे यांचे भाषण होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

असा असेल कार्यक्रम

– सकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत हवन व पूजा. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

– सकाळी ८.३० ते ९ या वेळेत लोकसभेत विधिवत सेंगोलची स्थापना केली जाईल. यासाठी तामिळनाडूच्या मठातील २० स्वामी, संत उपस्थित राहणार आहेत.

– सकाळी ९ ते ९.३० या वेळेत प्रार्थना सभा होणार आहे. यामध्ये शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत.

– दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दुपारी १२ वाजता राष्ट्रगीताने होईल.

– यादरम्यान दोन लघुपट दाखविण्यात येणार आहेत.

– राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, राष्ट्रपती द्रौपदी मुरमुर आणि उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या संदेशाचे वाचन करतील.

– राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे संबोधित करणार आहेत.

– लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संबोधित करणार आहेत.

– यानंतर नाणी आणि शिक्के प्रसिद्ध होतील.

– पंतप्रधान मोदी संबोधित करतील आणि दुपारी अडीच वाजता सोहळ्याची सांगता होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -