मोदींबाबत अपप्रचार; बीबीसीचा ‘तो’ माहितीपट केंद्राने हटवला, ट्वीट्सही केले ब्लॉक

India the Modi Question | या माहितीपटात नागरिकत्व कायदा (CAA) आणि जम्मू-काश्मीरमधील 370 हटवल्याचा संदर्भ देत सरकारवर टीका करण्यात आली आहे.

happy new year 2023 pm narendra modi president draupadi murmu congress mp rahul gandhi congratulated on the new year welcome 2023

India the Modi Question | नवी दिल्ली – बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रसारित केलेला माहितीपट केंद्र सरकारच्या आदेशानंतर हटवण्यात आला आहे. याप्रकरणी युट्यूबने व्हिडीओ ब्लॉक केला असून ट्विटरवरील ५० ट्वीटही ब्लॉक करण्यात आले आहेत. हा माहितीपट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रोपागंडा असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.

बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ‘इंडिया : द मोदी क्वेशन’ नावाचा एक माहितीपट युट्यूबवर प्रसारित केल होता. या माहितीपटात २००२ मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे हा माहितीपट प्रसारित होताच केंद्र सरकार आणि भाजपाने याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या दोन भागांच्या बीबीसी माहितीपटामध्ये पंतप्रधान मोदींवर गुजरात दंगलीतील आरोपींना वाचवण्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, या माहितीपटात नागरिकत्व कायदा (CAA) आणि जम्मू-काश्मीरमधील 370 हटवल्याचा संदर्भ देत सरकारवर टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा – बीबीसीचा माहितीपट पक्षपाती, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र टीका

या माहितीपटाची दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कारवाई केली. युट्यूबवर प्रसारित झालेला व्हिडिओ हटवण्यात आला असून या युट्यूबच्या लिंक ५० ट्विटर खात्यांवरूनही शेअर करण्यात आल्या होत्या. ते ब्लॉक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत हे निर्देश दिले आहेत.


दरम्यान, योग्य संशोधनानंतरच हा माहितीपट बनवण्यात आल्याची माहिती बीबीसीकडून देण्यात आली होती. या माहितीपटाच्या माध्यमातून महत्त्वाच्या मुद्यांचा उलगडा निष्पक्ष भूमिकेतून करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) च्या एका प्रवक्त्यानं डॉक्यूमेंट्रीसाठी उच्च संपादकीय मूल्यांचा आधार घेत संशोधन करण्यात आल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा – बीबीसी म्हणजे बोगस बायस कँपेन, मोदींची बदनामी सुरू आहे; आशिष शेलारांचा हल्लाबोल

परराष्ट्र मंत्रालयाकडूनही निषेध

हा एक प्रचाराचा प्रकार आहे. जी विशिष्ट बदनामीकारक कहाणी पुढे नेण्यासाठी डिझाइन केलेली आहे, असे आम्हाला वाटते. यात पूर्वग्रहदूषित, निष्पक्षतेचा अभाव आणि वसाहतवादी मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांनी तपास आणि पडताळणी यासारख्या शब्दांचा वापर केल्याने एक विशेष मानसिकता असल्याचे जाणवते, असे परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाबाबत सांगितले.