कोण आहेत नुपूर शर्मा? ज्यांच्या एका वक्तव्यामुळे आखाती देशांनी पुकारला भारताविरोधात एल्गार

नुपूर शर्मा या पेशाने वकिल असून London School Of Arts मधून त्यांनी LLM ची पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण घेत असतानाच त्या राजकारण सक्रीय होत्या.

who is nupur sharma

पैंगबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबाबत अपशब्द वापरल्यावरून भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आखाती देशातही उमटले असून भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो चिटकवण्यात आले आहेत. दरम्यान, नुपूर शर्मा यांना आपल्या पदावरून हटवण्यात आले असून नुपूर शर्मा यांनीही आपले वक्तव्य मागे घेतले. या दरम्यान, नुपूर शर्मा नक्की कोण? त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Prophet Muhammad conflict who is Nupur Sharma suspended bjp national spokeperson)

नुपूर शर्मा कोण?

नुपूर शर्मा यांचा जन्म २३ एप्रिल १९८५ साली झाला. त्या भारतीय जनता पक्षाच्या (Bhartiya Janata Party) राष्ट्रीय प्रवक्त्या (National Spokeperson) होत्या. त्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीच्या सदस्यही होत्या. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून सुरू झालेल्या गदारोळानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

नुपूर शर्मा यांच्या लिंक्डिन प्रोफाईलवरून त्या वकिल आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापिठातून वकिलाची पदवी प्राप्त केली. तर, २०११ साली लंडन स्कूल ऑफ आर्ट्समधून (London School Of Arts) त्यांनी एलएलएम पूर्ण केलं आहे.

हेही वाचा – भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात आणखी एक FIR दाखल; मोहम्मद पैगंबरांविरोधात केले वादग्रस्त वक्तव्य

राजकीय प्रवास

कॉलेजच्या दिवसांपासूनच नुपूर या राजकारणात सक्रीय होत्या. २००८ साली त्या दिल्ली युनिर्व्हसिटी स्टुड्न्ट युनियनच्या (Delhi University Students Union) अध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. एबीवीपीमधून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. एबीवीपीमधून निवडणूक जिंकणाऱ्या त्या एकमेव उमेदवार होत्या.

विद्यापिठीय राजकारणातून बाहेर पडत नुपूर यांनी २०१० मध्ये भाजपच्या युवा मोर्चामध्ये सक्रीय सहभाग घेतला. २०१५ साली दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना हार पत्कारावी लागली.

हेही वाचा – Nupur Sharma : टीव्ही वाहिनीवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात मुंबई एफआयआर दाखल

काय आहे वाद?

नुपूर शर्मा यांनी एका चॅनेलमधील ज्ञानवापी मस्जिदीबाबात सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे कानपूरमध्ये  प्रचंड राडा झाला. दगडफेक होऊन अनेक लोक जखमी झाले. तसेच, याचे पडसाद आखाती देशातही उमटले.

मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वादग्रस्त विधानाप्रकरणी नुपूर शर्माविरुद्ध मुंबई आणि हैदराबादमध्ये अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीनंतर शर्मा यांच्याविरुद्ध IPCच्या कलम 153A, 5295A, 05B अंतर्गत मुंबईत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचप्रमाणे हैदराबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शर्मा यांच्याविरुद्ध सायबर क्राईम पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 505 (2), 506, 153 (ए), 504 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.