घरताज्या घडामोडीCovaxin संबंधित आणखी माहिती द्या, WHO चा भारताला मोठा झटका

Covaxin संबंधित आणखी माहिती द्या, WHO चा भारताला मोठा झटका

Subscribe

WHOकडे आलेल्या सदोष अर्जामुळे भारताच्या प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाले

कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिलेली नाही.  कोव्हॅक्सिनच्या मंजूरीसाठी भारत वाट पाहत आहे. मात्र भारत बायोटेककडून देण्यात आलेल्या डेटावर जागतिक आरोग्य संघटनेकडून अभ्यास करण्यात आला आणि WHO ने भारताला मोठा झटका दिला आहे. कोव्हॅक्सिन लसी संदर्भात भारत बायोटेकने आणथी माहिती द्यावी असे WHO ने म्हटले आहे.  बुधवारी WHOने दिलेल्या एका स्पष्टीकरणात  AIPSN ने कोव्हॅक्सिन लसीच्या परीक्षणासाठी आलेला डेटाचा उल्लेख करत म्हटले की,  WHOकडे आलेल्या सदोष अर्जामुळे भारताच्या प्रतिष्ठेचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याने भारतीय विज्ञान आणि वियमक प्रणालींची स्थिती बदनाम केली आहे. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्थरावर तपासणी आणि संशोधनावर आले आहे.

कोव्हॅक्सिन लसीवरुन अनेक वाद समोर आले होते. कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायल्स रिपोर्ट येण्याआधीच लसीला आपतकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती.मात्र त्यानंतर लस कोरोना विरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे समोर आले. मात्र WHO कडून अद्याप कोव्हॅक्सिन लसीला मंजूरी देण्यात आली नाही.   क्लिनिकल ट्रायलमध्ये रिजेक्ट केलेल्या अपुऱ्या डेटासह त्याचप्रमाणे पाठींबा देणारे सरकार मागे पडले आणि त्यानंतर EUA चे अनुदान मिळाले. तिसऱ्या स्थरातील ट्रायलसाठी अधिक विस्तृत माहिती  जारी करणे गरजेचे होते. मात्र दोन महिन्यांनी अंतरिम निकाल आणि जून २०२१मध्ये पूर्ण परीक्षण डेटा जारी करण्यात आला,असे  AIPSN कडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

AIPSNच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिक आणि इतर लोकांनी टीका केल्यानंतरही भारत बायोटेक एक पूर्व प्रकाशन पत्र पोस्ट करणे बाकी आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या क्लिनिकल चाचणी निकालांचे आचरण आणि विश्लेषण करण्यासाठी वैज्ञानिकांच्या नियमांचे पालन करणे, त्याचप्रमाणे पूर्व प्रकाशन पत्र पोस्ट करणे आणि पूर्ण पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे असल्याचे कंपनीला सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Vaccination: देशातील २५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण, २ ऑक्टोबरपासून आणखी एका लशीचा पर्याय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -