Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Aditya L-1 Mission : आदित्य एल-1 आज घेणार सूर्याकडे झेप; संपूर्ण जगाचं...

Aditya L-1 Mission : आदित्य एल-1 आज घेणार सूर्याकडे झेप; संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे

Subscribe

चंद्रयान 3 च्या यशस्वी उड्डाण आणि लॉचिंगनंतर आता भारत वेगळ्या मोहीमेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या (ISRO) आज पहिल्या सूर्य मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आज (2 सप्टेंबर) भारताचे आदित्य एल-1 (Aditya L-1 ) सूर्याकडे झेप घेणार आहे.

चंद्रयान 3 च्या यशस्वी उड्डाण आणि लॉचिंगनंतर आता भारत वेगळ्या मोहीमेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या (ISRO) आज पहिल्या सूर्य मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आज (2 सप्टेंबर) भारताचे आदित्य एल-1 (Aditya L-1 ) सूर्याकडे झेप घेणार आहे. आदित्य एल-1 या मोहिमेबाबत लोकांमध्ये सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (PSLV C57 Aditya L1 Mission Aditya L1 will stay approximately 1 5 million km away from Earth)

श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान पोलार सॅटेलाईट (PSLV-C57) द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या सुर्याच्या दिशेने झेप घेणाऱ्या यानाला आदित्य असे नाव देण्यात आले आहे. कारण सूर्याला आदित्य या नावानेही ओळखले जाते. त्यामुळे आदित्य हे नाव ठेवण्यात आले आहे. तर एल 1 म्हणजे लॅग्रेंज पॉईंट 1. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील पहिल्या पॉईंटवर भारताचे हे यान जाणार आहे.

इस्रोनेच्या माहितीनुसार, एल 1 पॉईंट हा पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे. आदित्य एल 1 हे सूर्याच्या एल 1 पॉईंटवरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. दरम्यान, इस्रोचं आदित्य एल1 मोहिम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे.

- Advertisement -

मिशन आदित्यचे थेट प्रक्षेपण ‘इथे’ पाहा

  • आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे.
  • यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातूनही या मिशनचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
  • डीडी वाहिनीवर देखील या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण पाहता यईल.
  • सकाळी 11.20 मिनिटांनी या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

‘आदित्य-एल1’ दररोज पाठवणार 1,440 फोटो

सूर्याचा अभ्यास करणारे भारताचे पहिले मिशन ‘आदित्य-एल1’ आज झेप घेणार आहे. यासाठी इस्रोने विशेष तयारी केली आहे. आदित्य-L1 चे प्राथमिक साधन ‘दृश्य उत्सर्जन रेषा कोरोनाग्राफ’ (VELC) इच्छित कक्षेत पोहोचल्यानंतर विश्लेषणासाठी ग्राउंड सेंटरला दररोज 1,440 फोटो पाठवणार आहे.


हेही वाचा – Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, ‘या’ प्रकरणी EDकडून कारवाई

- Advertisment -