भयंकर! आईचे मुंडके धडावेगळं करत मुलगा म्हणाला ती राक्षस होती

ब्रिटनमध्ये एक भयंकर घटना घडली असून एका मुलाने जन्मदात्या आईची निघृण हत्या करत तिच्या शरीराचे ११ तुकडे केले. एवढ्यावरचं त्याच हे क्रौर्य थांबल नाही तर नंतर त्याने आईचे मुंडके धडावेगळे केले. आई दैत्य होती म्हणूनच गॉडने मला तिला ठार करायचा आदेश दिल्याचं या मनोरुग्ण मुलाने न्यायालयात सांगितलं. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अर्नेस्ट ग्रुजा (४१) असे त्याचे नाव असून विस्लावा मिर्जैजेस्का (५९) असे त्याच्या आईचे नाव आहे.

अर्नेस्ट २२ फेब्रुवारीला घराशेजारील दुकानात सामान घेण्यासाठी गेला होता. पण त्याचे रक्ताळलेले कपडे बघून दुकानदाराला संशय आला. त्याने तात्काळ पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस थेट अर्नेस्टच्या घरी पोहचले. त्यावेळी घरातील दृश्य बघून पोलिसांना धक्काच बसला. कारण अर्नेस्ट त्याच्या बेडवर बसलेला होता आणि त्याच्या हातात आईचे मुंडके होते. घरभर रक्ताचे थारोळे पसरलेले होते. कपाटात आणि फ्रिजमध्ये विस्लावा यांच्या शरीराचे तुकडे ठेवण्यात आले होते.  आईची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अर्नेस्टला तात्काळ अटक केली. चौकशीत त्याने आई राक्षस असल्याने तिला ठार करण्याचे आदेश गॉडनेच आपल्याला दिल्याचे सांगितले. तसेच तिच्या शरीराच्या तुकड्यांवर पवित्र पाणी आणि रक्त शिंपडल्यास ती पुन्हा जिवंत होणार असेही त्याने पोलिसांना आणि नंतर न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, अर्नेस्टचे मानसिक संतुलन ढासळले असून तो मनोरुग्ण असल्याचे न्यायालयाने मान्य केले. पण त्याने केलेले अघोरी कृत्य मानवतेला काळीमा फासणारे असल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण तो मनोरुग्ण असल्याने रुग्णालयातच त्याला कायमस्वरूपी ही शिक्षा भोगावी लागणार आहे.