Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पीटीआयचे 'हे' मोठे नेते नजरकैदेत, रावळपिंडी प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे दिले कारण

पीटीआयचे ‘हे’ मोठे नेते नजरकैदेत, रावळपिंडी प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे दिले कारण

Subscribe

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीटीआयचे ज्येष्ठ नेते महमूद कुरेशी यांना पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने पीटीआय नेते जमशेद चीमा आणि त्यांची पत्नी मुसरत चीमा यांनाही नजरकैदेत ठेवले आहे. या प्रकरणी रावळपिंडी प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावळपिंडीच्या आयुक्तांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सहकारी नेत्यांना अटक करण्याचे आदेश जारी केले आहेत. रावळपिंडीच्या आयुक्तांनी पाकिस्तानच्या सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या कलम ३ अंतर्गत नजरकैदेचे आदेश दिले आहेत. माजी मंत्री कुरेशी आणि पीटीआय नेते जमशेद चीमा आणि त्यांची पत्नी मुसरत यांना १५ दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

रावळपिंडीच्या अदियाली तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही मिनिटानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली. कुरेशीची सुटका झाल्यानंतर तत्काळ मुसरत चीमालाही अटक करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री म्हणाले की, मी अजूनही पीटीआयचा एक भाग आहे आणि राहणार आहे.

पीटीआयच्या उपाध्यक्षा शिरीन मजारी यांनी याआधी आपण पक्ष सोडणार आणि राजकारण सोडणार असल्याचे सांगितले होते, त्यानंतर काही तासांनी त्यांनी पक्षात राहण्याची घोषणा केली. कुरेशी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते की, पुन्हा ते आंदोलन करणार नाहीत आणि भडकवणार देखील नाहीत. यानंतर हायकोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. पंजाब आणि खैबर-पख्तुनख्वा प्रांतात दंगली आणि जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना अटक केली होती.

- Advertisement -

९ मे रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर अनेक आंदोलनं करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रमुख नेत्यांमध्ये कुरेशीचाही समावेश आहे.


हेही वाचा : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा वाद शिगेला, ‘या’ विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार


 

- Advertisment -