घरदेश-विदेशअरेच्चा! यासाठी हवा 'या' महिलेला घटस्फोट

अरेच्चा! यासाठी हवा ‘या’ महिलेला घटस्फोट

Subscribe

पबजी खेळणाऱ्याला या गेममधून आत्मिक समाधान मिळत असले तरी त्याच्या कुटुंबियांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अहमदाबादमध्ये पबजीमुळे एका माणसाचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

पबजी गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पबजी खेळणाऱ्याला या गेममधून आत्मिक समाधान मिळत असले तरी त्याच्या कुटुंबियांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अहमदाबादमध्ये पबजीमुळे एका माणसाचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. पबजीचे व्यसन लागलेल्या एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या पतीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. पबजी गेम मधील गेमिंग पार्टनर आपल्याला आवडत असल्याने पत्तीपासून घटस्फोट हवा असल्याचा दावा या तरुणींने केला आहे.

या कारणासाठी महिलेला घटस्फोट

काही दिवसांपूर्वी युएईमध्ये पबजीमुळे एका माणसाचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा पबजीमुळे एका तरुणाचा संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. पबजीचे व्यसन लागलेल्या एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या पतीविरोधात घटस्फोटाचा मागणी केली आहे. पबजी गेम मधील गेमिंग पार्टनर आवडत असून आपल्याला त्याच्या संपर्कात राहायचे आहे. या शुल्लक कारणासाठी पत्नीने हा घटस्फोटाची मागणी केली आहे. ही घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पबजीमधला पार्टनर आवडल्याने घटस्फोट घ्यायचा आहे. त्यासाठी मदत करा, असा फोन महिला हेल्पलाइनमध्ये (१८१) काम करत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आला. फोन करणारी महिला एका प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्याची माहिती अधिकारी महिलेने दिली आहे.

- Advertisement -

या महिलेचा गेल्या वर्षी एका बांधकाम कंत्राटदारासोबत विवाह झाला असून या महिलेला एक लहान मुलगा देखील आहे. काही महिन्यांपूर्वी तिला पबजीचं व्यसन जडले असून हेल्पलाईन कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पतीशी कोणताही वाद होत नाही, असे त्या महिलेने सांगितले आहे. तिला केवळ पबजीमुळे संपर्कात आलेल्या त्या तरुणासोबत राहायचे आहे. त्यासाठी ती पतीचे घर सोडून माहेरी आली आहे. या महिलेचे कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात आहे,’ अशी माहिती हेल्पलाईनमध्ये समुपदेशक असलेल्या सोनल सागठिया यांनी दिली आहे.


वाचा – रामकृष्ण हरी! बायको पेक्षी पबजी भारी

- Advertisement -

वाचा – …तर ‘पबजी’ गेमवर निर्बंध घाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -