घरदेश-विदेशगुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या ३ जणांना अटक

गुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या ३ जणांना अटक

Subscribe

गुजरातमध्ये पबजी खेळायला बंदी असताना देखील पबजी गेम खेळणाऱ्या ३ जणांवर कारावाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

पबजी गेम तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेताना दिसत आहे. तसेच या खेळाचे अनेक दुष्परिणाम आतापर्यंत समोर आले असून अनेक तरूणांमध्ये या खेळामुळे हिंसक भावना वाढीस लागत आहे. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने राजकोटमध्ये पबजी गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे असताना काही दिवसांपूर्वी पबजी खेळणाऱ्या दहा जणांना अटक केल्याची घटना ताजी असताना गुजरात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्या तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


वाचा – धक्कादायक…’पबजी’च्या नादात प्यायला ‘हे’

- Advertisement -

या ठिकाणी पबजी खेळण्यास बंदी

गुजरातमधीव सूरत, रोजकोट आणि अहमदाबाद या शहरात पबजी खेळणाऱ्यांवर पोलिसांनी बंदी घातली आहे. बंदीनंततरही मोबाईलमध्ये पबजी गेम खेलताना आढळल्याने पोलिसांनी तीन जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. हे तरुण वेगवेगळ्या ठिकाणी पबजी गेम खेळत असल्याचे पोलिसांना सॅटेलाइटवरुन कळाले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना अटक केली आहे. १४ मार्च रोजी अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून पबजीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली होती. या कायद्याचे उल्ल्ंघन केल्याप्रकरणी या तिघांवर १८८ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.


वाचा – गुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या १० जणांना अटक

- Advertisement -

वाचा – पबजी खेळू नको म्हटल्यामुळे, थेट आत्महत्येचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -