घरदेश-विदेश'या' देशाने आणली पब्जीवर बंदी, भारताकडून देखील बंदीची मागणी

‘या’ देशाने आणली पब्जीवर बंदी, भारताकडून देखील बंदीची मागणी

Subscribe

पब्जी गेम सतत खेळण्यामुळे लहान मुलांच्या वर्तवणुकीवर नकारात्मक परिणाम होत असल्याने कोर्टाने निर्णय घेतला असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे.

मोबाईल गेम पब्जीवर बंदी घालण्याची मागणी नेपाळ केली असतानाच आता भारतात देखील या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या गेममधील हिंसेमुळे मुलांना वाईट वळण लागण्याची भिती असल्यामुळे या गेमवर बंदी घातलीच पाहीजे, अशी मागणी करण्यात येत आहे. पब्जी गेमवर कोर्टाच्या आदेशानंतर नेपाळ या देशात बंदी घालण्यात आली आहे. हा गेम सतत खेळण्यामुळे लहान मुलांच्या वर्तवणुकीवर नकारात्मक परिणाम होत असल्याने कोर्टाने निर्णय घेतला असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे.

गेम खेळताना आढळल्यास अटक

या संदर्भातील माहिती नेपाळ मधील माध्यमांनी प्रसारित केले आहे. या दरम्यान हा गेम खेळताना दिसल्यास त्या व्यक्तीस अटक केली जाणार आहे. नेपाळमध्ये या गेमवर बंदी घातल्यानंतर या गेमवर भारताकडून देखील बंदी घालण्याची मागणी होत आहे. नेपाळी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, द नेपाळ टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने सर्व इंटरनेट, मोबाइल सेवा देणाऱ्यांना पब्जी या गेमवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी घातल्यानंतर देखील हा गेम खेळताना कोणी आढळल्यास त्यास अटक करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोर्टाने लक्ष वेधत बंदीची परवानगी

पब्जी गेम खेळल्याने लहान मुलांवर नकारात्मक परिणाम होत आहे, असे महानगरीय गुन्हे शाखेद्वारे काठमांडू जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. यावर कोर्टाने लक्ष वेधत पब्जीवर बंदी घालण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -