घरCORONA UPDATECorona Impact: सर्व प्रकारचे EMI स्थगित, पण ECS चे काय? वाचा

Corona Impact: सर्व प्रकारचे EMI स्थगित, पण ECS चे काय? वाचा

Subscribe

कोरोना संक्रमन रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशातील जनता आर्थिक विवंचनेत अडकली होती. त्यातून दिलासा देण्यासाठी बँकांच्या EMI मधून सूट देण्याची मागणी पुढे आली होती. मात्र त्याची स्पष्टता होत नव्हती. त्यानंतर आज अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी ट्विट करत आपल्या शाखांना संवेदनशील होण्याचा सल्ला दिला आहे. यापुढील तीन महिन्यांसाठी गृह, गाडी, पिककर्ज अशा सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र जे लोक ECS द्वारे आपले हप्ते देतात, त्यांच्यासाठीही एक पर्याय बँकांनी दिला आहे. आज काही बँकांनी ट्विट करत रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनक सूचनांचे अवलंबन करत असल्याचे सांगितले. कर्जदारांच्या मोबाईलवर कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यासंबंधी मेसेज देण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने केली होती.

युनियन बँक ऑफ इंडियाचे संचालक राजकिरण राय जी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या सर्व शाखांना कर्जाचा हप्ता स्थगित झाल्याचे कळवले आहे. जर कुणी ECS चा पर्याय निवडलेला असेल तर त्यांना तो बंद करण्याची सोयही दिलेली आहे. त्यांनी बँक शाखेशी ईमेल किंवा डिजिटल माध्यमावर जाऊन तो बंद करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राय पुढे म्हणाले की, काही कायदेशीर बाबींमुळे बँक स्वतःहून ईसीएस पेमेंट रोखू शकत नाही. त्यासाठी ग्राहकांना स्वतःहून हा पर्याय बंद करण्यासाठी सांगावे लागणार आहे. तसेच ज्या कर्जदारांच्या मिळकतीवर फारसा विपरीत परिणाम झालेला नाही, त्यांनी आपले हप्ते नियमित भरावेत, असेही आवाहन राय यांनी केले आहे.

- Advertisement -

याचप्रकारे इंडियन बँक आणि पीएनबी बँकांनी तीन महिन्यांसाठी कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याबाबत ट्विट केले आहे. कॅनरा बँकेने देखील ट्विट करत, ३१ मे २०२० पर्यंत आपल्या ग्राहकांचे कर्जाचे हप्ते स्थगित केले आहेत. बँकानी स्पष्ट सांगितल्यामुळे आता कर्जाचे हप्ते फेडण्यासंदर्भात कर्जदारांना जे पत्र आले होते, त्या सर्व शंकाचे निरसन झाले आहे.

 

 

मागच्या आठवड्यात शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारचे कर्जाचे तीन हप्ते पुढे ढकलण्याबाबत निर्देश दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -