घरCORONA UPDATEअटीशर्तीसहीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरु करणार - नितीन गडकरी

अटीशर्तीसहीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरु करणार – नितीन गडकरी

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात मागच्या महिनाभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, लवकरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच सुरु केली जाणार आहे. मात्र काही अटी आणि शर्तीसहीत ही वाहतूक सुरु केली जाईल, असे ते म्हणाले. २४ मार्च रोजी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली, तेव्हापासून देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे.

गडकरी म्हणाले की, जनतेमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी परिवहन व्यवस्थेला पुर्ववत करण्याची गरज आहे. त्यामुळे काही मार्गदर्शक तत्त्वांवर सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला खुले केले पाहीजे. नितीन गडकरी यांनी आज बस आणि कार ऑपरेटर्स ऑफ इंडियाच्या सदस्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी बस आणि कार चालकांनी हातांना सॅनिटायझर लावणे, मास्क घालणे अशा उपाययोजनांचा स्विकार करण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -

केंद्रीय परिवहन खाते लंडन मॉडेलचा अवलंब करणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. ज्यामध्ये सरकारी गुंतवणूक कमी करुन जास्तीत जास्त खासगी गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाईल. यासोबतच गडकरी यांनी बस आणि ट्रकच्या जुन्या वाहनांबाबतही इशारा दिला. सध्या १७ मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन घोषित केल्यामुळे तोपर्यंत हवाई आणि रस्ते वाहतूक बंद राहणार आहे.

देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढले असून कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांपर्यंत पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ हजार ६९४ पर्यंत पोहोचला आहे. मागच्या २४ तासांत देशभरात २ हजार ९५८ नवे रुग्ण समोर आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -