घरदेश-विदेशमोदी सरकारच्या चुकीमुळे 'पुलवामा हल्ला'; सत्यपाल मलिकांचं खळबळजनक वक्तव्य

मोदी सरकारच्या चुकीमुळे ‘पुलवामा हल्ला’; सत्यपाल मलिकांचं खळबळजनक वक्तव्य

Subscribe

पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र गृहमंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाही ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.

जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट द व्हायरल या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सत्यपाल मलिक यांनी केला आहे. Pulwama attack due to Modi government s mistake Sensational statement of Satya Pal Malik

पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र गृहमंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाही ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

पुलवामा घटनेनंतर मी मोदींशी संवाद साधला असता त्यांनी गप्प राहण्यास सांगितल्याचे मलिक म्हणाले. तसंचं, अजित डोवाल यांनी देखील मला गप्प राहण्यास सांगितलं. या हल्ल्याचं बोट पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा सरकारला निवडणुकीत होईल, असं सरकारचं धोरण होतं, असा गौप्यस्फोट देखील मलिक यांनी केला आहे.

का‌ॅंग्रेसचं ट्वीट

पुलवामा हल्ला आणि त्यात 40 जवान तुमच्या सराकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळालं असतं तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीमुळे कारवाई करणं अपेक्षित होतं. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलंच नाह, तर स्वत: ची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला. पुलवामावर सत्यपाल मलिक यांचा खुलासा ऐकून देश स्तब्ध झाला आहे, असं ट्वीट काॅंग्रेसने केलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: मोठी बातमी: पुलवामा हल्ला पुर्वनियोजित, ‘त्या’ 40 जवानांची हत्या; राऊतांचा गंभीर आरोप )

सत्यपाल मलिक यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्यावरुन सरकारला लक्ष्य केलं जाऊ शकतं. याआधीही सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोदींची भेट घेतली असता त्यांच्याशी पुढच्या पाच मिनिटांत आपलं भांडण असं राज्यपाल मलिक म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -