घरदेश-विदेशPulwama Attack : 14 फेब्रुवारी 'प्रेमाचा दिवस' असला तरी भारतासाठी ठरला 'काळा दिवस'

Pulwama Attack : 14 फेब्रुवारी ‘प्रेमाचा दिवस’ असला तरी भारतासाठी ठरला ‘काळा दिवस’

Subscribe

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदादेखील 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरातील लोक प्रेमाचा दिवस म्हणजेच ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करत आहेत. मात्र, भारतात 2019 पासून या दिवसाची नोंद काळा दिवस म्हणून करण्यात आली. 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात CRPF च्या 40 जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आज याचं काळ्या दिवसाला एकूण 4 वर्ष पूर्ण झाली असून संपूर्ण देशभरातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

कसा झाला हल्ला

14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा बसमधून जात होता. पुलवामा येथे पोहोचताच CRPF च्या बसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 40 CRPF जवान जागीच शहीद झाले. पुलवामा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. दरम्यान, त्यानंतर या हल्ल्याचे प्रत्त्युत्तर देत भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानाच्या अंतर्गत येणाऱ्या काश्मिरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. भारताने 26 फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

- Advertisement -

भारतात 14 फेब्रुवारी मानला जातो ‘काळा दिवस’

Pulwama attack anniversary: What happened on February 14, 2019; know about  our martyred CRPF soldiers

दरम्यान, 14 फेब्रुवारी संपूर्ण जगासाठी जरी प्रेमाचा दिवस असला तरी 2019 पासून संपूर्ण भारतात 14 फेब्रुवारी हा काळादिवस मानला जातो. या दिवशी पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जाते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -