Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Pulwama Encounter: पुलवामातील चकमकीत Let कमांडर अबू हरैरासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Encounter: पुलवामातील चकमकीत Let कमांडर अबू हरैरासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Related Story

- Advertisement -

काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री दहशतवाद्यांसह सुरु झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय जवान आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत लष्कर-ए-तोय्यबाचा टॉप कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरासह तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पाकिस्तानचा दहशतवादी एजाज उर्फ ​​अबू हुरैराचं आह. तर इतर दोन काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवादी आहेत.

श्रीनगर- उत्तर प्रदेशाच्या लखनऊमधून दोन दहशवाद्यांना अटक केल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा अधिकचं सतर्क झाली आहे. काश्मीर खोऱ्यातून भारतात घुस पाहणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याकडून मोठी शोध मोहिम सुरु झाली आहे. याच शोध मोहिमेदरम्यान एक दहशतवाद्यांचा गट पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री उशिरा त्यांच्या संपर्कातील एकाला भेटायला येणार अशी गुप्त माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सैन्यासह स्थानिक पोलीस, सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाला घेराव घालण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यरात्री उशीरा दहशवाद्यांनी सैन्याच्या दिशेने गोळीबार करत जवानांचा सापळा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र भारतीय सैन दलाने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवायांना पाकिस्तानकडूनच पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये  रेल्वे ट्रॅक उडवण्याचा कट

- Advertisement -

देशात पुन्हा घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जात आहे. दहशवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील रेल्वे ट्रॅक उडवण्याचा कट रचला होता. मात्र सुरक्षा दलाने वेळीच काझीगुंडमधील दमजन येथून आयईडीचा साठा जप्त करत मोठी दहशतवादी कारवाई रोखली आहे.

मंगळवारी सायंकाळी काझीगुंडमधील दमजन येथील रेल्वे ट्रॅकजवळ पोलीस, केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त पथक नियमित गस्त घालत होते. यावेळी जवानांना येथील रेल्वे ट्रॅकजवळील एका ठिकाणी आयईडी स्फोट असल्याचे दिसले. यावेळी जवानांनी बॉम्ब डिस्पोजल पथकाला घटनेची माहिती देत तात्काळ पाचरण करण्यास सांगितले. बॉम्ब डिस्पोजल पथकाने घटनास्थळी धाव घेत आयईडी स्फोटक ताब्यात घेत सुरक्षितपणे ते नष्ट केले.

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

- Advertisement -

बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येनं मजूर प्रवास करतात. या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळेच या गाड्यांना लक्ष्य करण्याचा प्लान आयएसआयकडून आखण्यात आल्याची माहिती आहे.


 

- Advertisement -