घरदेश-विदेशपुलवामामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

पुलवामामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली आहे. पुलवामा जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या लष्कराच्या जवानांवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असून या दहशतवाद्याकडून अत्याधुनिक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. गस्तीवरचे जवान सावध होत त्यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार सुरु केला आहे. यावेळत चकमक सुरु असलेल्या संपूर्ण भागाला लष्कराने घेरले असून चकमक अद्याप सुरु आहे.

इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरु असलेल्या चकमकीत लष्कराने संपूर्ण भागाला घेरले आहे. तसेच या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तसेच अन्य दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

चकमक अद्याप सुरुच

दक्षीण काश्मिरच्या पुलवामातील अवंतीपुरा परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. दरम्यान त्याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान चकमक सुरु असून दोन दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

शनिवारी ४ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जवानांना पुलवामा जिल्ह्यातील हाजिन राजपोर भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानाना यश आले होते.

- Advertisement -

वाचा – पुलवामामध्ये चकमक; ६ दहशतवाद्यांचा खात्मा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -