घरदेश-विदेशPunjab Accident : पंजाबमध्ये भीषण अपघात; १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

Punjab Accident : पंजाबमध्ये भीषण अपघात; १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

Subscribe

पंजाबमध्ये लुधियाणामधील अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर खन्ना येथे 100 वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली – अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण आपघात झाला. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे खन्नाजवळ सुमारे १०० वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. धुक्यांमुळे हा अपघात झालं आहे अस बोललं जात आहे.

या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडीं झाली होती. खराब झालेली वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातामध्ये जीवितहानी बरोबरच आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

 अपघातमध्ये चारचाकी, दुचाकी आणि एका बसचाही समावेश आहे. या भीषण अपघातामुळे अमृतसर – दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर वाहतुककोंडीची समस्या निर्माण झाली होती. २५ ते ३० किलोमिटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बसमधून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.

या अपघातांमध्ये गाड्यांची संख्या जास्त आहे. गाड्यांचे खूप प्रमानात नुकसान झाले आहे. तर बसच्या पुढील भागाचे पूर्ण खराब झाला आहे.  पोलिसांकडे २२ ते २५ वाहनांची यादी आहे. पुढील तपास सुरू आहे. ज्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या वाहनांची माहिती पोलिसांकडे असल्याचं समजते.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 20-25 किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि धुके यामुळे दृष्यमानता कमी होऊन अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे 20-25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -