घरताज्या घडामोडीPunjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार...

Punjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली, ‘या’ दिवशी होणार मतदान

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला अखेर सुरूवात झाली आहे. परंतु पंजाब विधानसभा निवडणुकांची तारीख बदलल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, पंजाबमध्ये निवडणूक १४ फेब्रवारी ऐवजी आता २० फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयागाने घेतला आहे.

१६ फेब्रुवारी रोजी गुरू रविदास जयंती असल्यामुळे अनेक पंजाबी लोकं वाराणसीला जातात. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी ही निवडणूक पुढे ढकलल्याची मागणी केली आहे. ही निवडणूक एक आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आज सोमवार महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, भाजपा आणि पंजाब लोक काँग्रेस पक्षाच्या पत्रावर मंथन करण्यात आलं. सर्वांनी निवडणूक आयोगाला विविध प्रकारचं पत्र लिहिलं होतं. बहुजन समाज पक्षाने ही मागणी केली होती.

- Advertisement -

निवडणूक लांबणीवर कशासाठी?

पत्रामध्ये लिहिण्यात आलंय की, १६ फेब्रुवारी रोजी गुरू रविदास जयंती असल्यामुळे राज्यातील मोठा वर्ग वाराणसीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया ठेवल्यास अनेकांना मुकांव लागू शकतं. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर घेण्यासाठी राजकीय पक्षातून मागणी केली जात आहे.


हेही वाचा :Indian Railway Recruitment 2022: दहावी पास झालेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -