घरAssembly Battle 2022Punjab Election: कॉमेडियन ते पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचा प्रवास

Punjab Election: कॉमेडियन ते पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचा प्रवास

Subscribe

पंजाबमधील संगरूर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे लोकसभा खासदार भगवंत मान यांना घवघवीत यश मिळाले आहे.

आम आदमी पार्टीने (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Aseembly Election) भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली होती. भगवंत मान हे धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आज भगवंत मान हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 82 हजार 23 मत मिळाली असून काँग्रेसचे दलवीर सिंग गोल्डी यांना 24 हजार 306 मतं मिळाली आहेत. पंजाबमध्ये आपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

48 वर्षीय भगवंत मान पंजाबमधील आम आदमी पार्टीचा सर्वात मोठा चेहरा आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपचे असे एकटे उमदेवार होते, जे जिंकले होते. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातील ते आपचे खासदार आहेत आणि आपच्या पंजाब युनिटचे अध्यक्ष आहेत. तसेच भगवंत मान आपचे पंजाब यूनिटचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. सध्या पंजाब विधानसभामध्ये आम आदमी पार्टी हा एक प्रमुख विरोधी पक्ष आहे.

- Advertisement -

भगवंत मान यांनी कॉमेडियन म्हणून केली करिअरची सुरुवात 

भगवंत मान यांनी आपली पहिली ओळख एक कॉमेडियनच्या रुपात केली होती आणि यामुळे ते पंजाबमध्ये लोकप्रिय झाले होते. तसेच त्यांनी करिअरची सुरुवात देखील विनोदी कलाकार म्हणून केली होती. पटियालामधील पंजाबी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत दोन गोल्ड मेडल मिळाले होते. त्यांचा जगतार जग्गीसोबतचा पहिला कॉमेडी अल्बम खूप प्रसिद्ध झाला होता. तसेच त्यांना टेलिव्हिजन शो ‘जुगून कहदां है’ देखील खूप लोकप्रिय झाला होता. भगवंत मान यांनी कॅनडा आणि इंग्लंडमध्ये खूप शो केले. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोमधून भगवंत मान खूप चर्चेत आले होते.

२०१२मध्ये भगवंत मान यांनी राजकारणात केला प्रवेश

भगवंत मान यांनी २०१२मध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात मनप्रीत बादल यांच्या पंजाब पीपल पार्टीसोबत केली. २०१२मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत संगरूरच्या विधानसभा जागेवरून भगवंत मान निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर २०१४मध्ये भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. संगरूर लोकसभा मतदारसंघातून ते आपच्या तिकिटावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

- Advertisement -

2014ची निवडणूक जिंकून मान लोकसभेत पोहोचले

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भगवंत मान यांना 2 लाखांहून जास्त मत मिळाली. संगरूर लोकसभा मतदारसंघात जिंकून भगवंत मान संसदेत पोहोचले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ज्या एकूण चार जागा जिंकल्या होत्या त्यापैकी एक भगवंत मान यांनी जिंकलेली संगरूर लोकसभा जागा होती.

सुखबीर सिंह बादल विरोधात भगवंत मान लढले होते निवडणूक

2017 साली पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान पंजाबची तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात जलालाबाद विधानसभेच्या जागेवर लढले होते. परंतु त्यांना सुखबीर सिंह विरोधात हार पत्करावी लागली.

…यामुळे खूप वादात राहिले होते भगवंत मान

2017 साली पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान दारू पिण्याच्या सवईमुळे भगवंत मान खूप वादात राहिले होते. त्यानंतर 2019मध्ये बरनालामधील आम आदमी पार्टीच्या एका रॅलीमध्ये त्यांनी कधीच दारू पिणार नसल्याची शपथ घेतली.

2017साली आम आदमी पार्टीच्या पंजाब यूनिटचे बनले प्रमुख

भगवंत मान यांना 2017 साली आम आदमी पार्टीचे पंजाब यूनिटमधले प्रमुख बनवले होते. परंतु 2018मध्ये ड्रग्ज आरोप आणि मानहानीच्या प्रकरणात आम आदमी पार्टी नेत्यांनी बिक्रम सिंह मजीठिया यांची माफी मागितली. त्यानंतर भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण अरविंद केजरीवाल यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी पुन्हा पद स्विकारले.

2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा संगरूरमधून मान जिंकले

2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत भगवंत मान पुन्हा एकदा संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. एक लाखांहून अधिक मत मिळवून मान जिंकले होते. खास म्हणजे आम आदमी पार्टीने संपूर्ण देशात जर कोणती एक जागा जिंकली ती म्हणजे भगवंत मान यांनी जिंकलेली संगरूर लोकसभा मतदारसंघाची जागा होती.


हेही वाचा – UP Election Result 2022 : शिवसेनेला यूपीतल्या लोकांनी साफ नाकारलं, उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -