Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर Assembly Battle 2022 Assembly elections 2022 : पंजाबच्या विजयाने AAP चा उत्साह वाढला: आता मोर्चा...

Assembly elections 2022 : पंजाबच्या विजयाने AAP चा उत्साह वाढला: आता मोर्चा गुजरात, हिमाचल प्रदेशकडे

Subscribe

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने एक हाती सत्ता मिळवत भाजपला धुळ चारली आहे. आता आपने विजयाची घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी पक्ष विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या अखेरीसपर्यंत होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुक आपच्या रडारवर आहेत. विशेष म्हणजे गुजरातमध्ये पक्ष आधीच प्रचारात काम करत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या आपने यावेळी 92 जागा जिंकल्या तर सत्ताधारी काँग्रेसच्या 18 जागांवर घट झाली.

वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, गुजरात आणि हिमाचल प्रदेश प्रामुख्याने आपच्या रडावर आहेत. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, सध्य़ा आम्ही गुजरात जिंकू असं म्हणत नाही. पण मोदींच्या पदावर आल्यानंतर राज्यात काहीतरी बदल झाला आहे. पाटीदार आंदोलन, उना आंदोलन आणि 2017 मध्ये काँग्रेसची चांगली कामगिरी दिसून आली, मात्र आता काँग्रेस पराभव मान्य करत आपसाठी मैदान सोडले आहे. आपने यापूर्वीच सुरतच्या पटेल पट्ट्यात 27 जागा जिंकून मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे सौराष्ट्र भागात पक्षाची मुळे मजबूत झाली आहेत.

- Advertisement -

त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसने रिक्त जागा भरण्यासाठी आप प्रयत्नशील आहे. अहवालानुसार, पुढील महिन्यात केजरीवाल आणि पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान पंतप्रधानांच्या गृहराज्यात पोहोचून आपच्या प्रचाराला बळ देऊ शकतात.

दिल्लीत काँग्रेसचा एक मतदार होता, जो आपमध्ये गेला. जेव्हा जेव्हा काँग्रेसने तुलनेने चांगली कामगिरी केली, तेव्हा तेव्हा आपला धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आपचे लक्ष हिमाचल प्रदेशाकडे आहे. याठिकाणी गुजरातच्या आधी मतदान होणार आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “पंजाबमधील विजयाने इतर राज्यांमध्ये आमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. हिमाचल प्रदेश सारख्या राज्यात, पंजाबने आमची मोहीम अधिक विश्वासार्ह बनवल्यामुळे आम्हाला एक सुरुवात दिसते. मात्र, अजूनही ग्राऊंड लेव्हलला बरेच काम करायचे आहे. डोंगरी राज्याचे राजकीय जातीय आणि प्रादेशिक गणित हे गुंतागुंतीचे एकत्रीकरण आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे आपची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नवीन नाही. 2013 मध्ये दिल्लीत 28 जागा जिंकल्यानंतर पक्षाने 2014 मध्ये लोकसभेच्या 400 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाने चार जागा जिंकल्या आणि या सर्व जागा पंजाबमध्ये होत्या. यानंतर आप दिल्लीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये बहुमताने विजयी झाला. 2019 मध्ये पक्षाने लोकसभेसाठी केवळ 100 उमेदवार उभे केले होते.


निवडणुका संपल्या; आता 31 मार्चपासून बंद होणार मोफत धान्य वाटप योजना?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -