पंजाब विधानसभेत अग्निपथ योजनेविरोधात ठराव मंजूर; भाजपकडून विरोध

punjab assembly passed a resolution against central government recruitment agnipath scheme

केंद्र सरकारकडून तरुणांना सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना घोषित करण्यात आली, मात्र या योजनेला उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेशसह पंजाबमधील तरुणांनी कडाडून विरोध केला, अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावरून उतरून केंद्राच्या योजनेविरोधात आंदोलने केली. काही ठिकाणी जाळफोळीसह, हिंसाचाराच्या घटना घडल्या. अशात पंजाब विधानसभेने गुरुवारी केंद्राच्या अग्निपथ सैन्य भरती योजनेविरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र याला भाजपचे दोन आमदार अश्विनी शर्मा आणि जंगीलाल महाजन यांनी या प्रस्तावाला विरोधा केला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.

या प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना मान म्हणाले की, अग्निपथ योजनेचा मुद्दा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहे. अग्निपथ ही योजना देशातील तरुणांच्या विरोधात आहे.

मात्र विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली आहे. अकाली दलाचे आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत ही योजना मागे घेण्याची मागणी केली.

विशेष म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या करारावर 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केल्यानंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने सुरू झाली. नंतर या वर्षासाठी भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली.

या योजनेला पाठिंबा देताना भगवंत मान यांनी यापूर्वी म्हटले होते की, भाजप सरकारची अग्निपथ योजना अत्यंत अतार्किक पाऊल आहे.. ज्यामुळे भारतीय लष्कराची जडणघडण खराब होईल.


ठाकरेंच्या शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध, पण तरीही सहमत- फडणवीस