घरAssembly Battle 2022Punjab Cabinet Expansion: उद्या पंजाबच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; १० मंत्री मंत्रिमंडळात केले जाऊन...

Punjab Cabinet Expansion: उद्या पंजाबच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; १० मंत्री मंत्रिमंडळात केले जाऊन शकतात सामील

Subscribe

पंजाबमध्ये उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित पंजाब मंत्रिमंडळात सामिल होणाऱ्या मंत्र्यांना शपथ देतील. मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा चंडीगढमध्ये पार पडणार आहे. माहितीनुसार पंजाबच्या मंत्रिमंडळात ८ ते १० मंत्री सामिल केले जाऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दुपारी १२.३० वाजता मंत्रिमंडळाची पाहिली बैठक होणार आहे.

१६ मार्चला आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी पंजाबचे १७वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शहीद भगत सिंग यांच्या मूळ गावी खटकड कलांमध्ये पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी भगवंत मान यांच्याकडून शपथ घेतली. त्यानंतर आम आदमी पार्टीने तीन दिवसीय विधानसभा सत्र बोलावले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपचे नवनिर्वाचित आमदार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पिवळ्या रंगाची पगडी घातली होती.

- Advertisement -

पंजाबच्या ११७ जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ९२ जागांवर विजय मिळवला. पंजाबच्या निवडणुकीत यावेळेस एक विशेष बाब पाहायला मिळाली. ती म्हणजे येथील जिंकलेल्या सर्व आमदारांपैकी एकूण ११ आमदारांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची हार झाली. चरणजीत सिंग चन्नी, नवजोत सिंग सिद्धू, प्रकाश सिंग बादल आणि अमरिंदर सिंगसह अनेक दिग्गज नेत्यांना आपच्या उमेदवारांनी हरवले.

पंजाबमध्ये काँग्रेसला १८ जागा मिळल्या. ‘आप’ने शिरोमणी अकाली दल-बहुजन समाज पक्ष युतीचाही पराभव केला. शिअद तीन तर भाजपला दोन आणि बसपाला केवळ एक जागेवर समाधानी राहावे लागले.


हेही वाचा – भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणार, मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -