घरताज्या घडामोडीपंजाबचा मुख्यमंत्री शीख असावा, मुख्यमंत्री पदाच्या नकारानंतर अंबिका सोनींचे वक्तव्य

पंजाबचा मुख्यमंत्री शीख असावा, मुख्यमंत्री पदाच्या नकारानंतर अंबिका सोनींचे वक्तव्य

Subscribe

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा गट आणि सिद्धू यांच्या गटाला शांत करण्यासाठी अंबिका सोनी यांच्या नावाची चर्चा होती.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान पंजाब काँग्रेसने मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांड आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिला आहे. काँग्रेस हायकमांडने अंबिका सोनींच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस केली आहे. परंतु अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री बनण्यास नकार दिला आहे. अंबिका सोनींनी म्हटलं आहे की, पंजाबचा नवा मुख्यमंत्री हा शीख असावा तसेच मी स्वतः मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली आहे. असे अंबिका सोनी यांनी म्हटलं असल्यामुळे आता सोनी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर फुलस्टॉप लावला आहे. सोनींच्या वक्तव्यामुळे आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी माध्यमांशी सावंद साधला आहे. यावेळी सोनी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाबाबत होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. सोनी यांनी म्हटलं आहे की, मी स्वतः मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंदिगढमध्ये बैठका घेत आहेत. तर पर्यावेक्षक सर्व आमदारांची बैठक घेऊन पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करत आहेत. माझा विश्वास आहे की, पंजाबचा पुढील मुख्यमंत्री हा सीख असावा असे काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये शीख मुख्यमंत्री होणार नाही तर कोणार होणार, मी पक्षाचा सम्मान करते परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नाही घेऊ शकत असे अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे. सध्या अंबिका सोनी दिल्लीत आहेत.

- Advertisement -

अंबिका सोनींच्या नावाचा शिफारस का?

पंजाब मुख्यमंत्रीपदाचा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर पंजाबमधील तणाव आणखीणच वाढला आहे. यामध्ये आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. परंतु त्यांनी मुख्यमंत्री बनण्यास नकार दिला आहे. अंबिका सोनी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांची राजकीय कारकिर्द ही ५० वर्षांपेक्षा अधिक आहे. अंबिका सोनी या काँग्रेसमधील गटबाजीत मध्यस्थी करण्यासाठी योग्य होत्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा गट आणि सिद्धू यांच्या गटाला शांत करण्यासाठी अंबिका सोनी यांच्या नावाची चर्चा होती. अंबिका सोनी या गांधी कुटुंबाच्या प्रत्येक पिढीपासून जोडल्या आहेत. इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारणात आणलं होते. यानंतर संजय गांधी यांच्यासोबत सोनी यांनी काम केलं आहे. तसेच सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबतही त्यांनी काम केलं आहे.

- Advertisement -

यामुळे अंबिका सोनी या अशा व्यक्ती होत्या की ज्या कॅप्टन यांना संभाळू शकत होत्या त्याचबरोबर त्यांच्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनाही कोणतीच अडचण झाली नसती. अंबिका सोनी या एक हिंदू आहेत आणि नवज्योत सिंग सिद्धू शीख त्यामुळे हिंदू-शीख असे एकत्र झाले असते. सोनी यांच्यामुळे पंजाबमधील हिंदू मतदारांना वळवण्यासाठी मदत झाली असती यामुळे काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांच्या नावाची शिफारस केली असल्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींच्या निर्णयाची प्रतीक्षा

काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसच्या सर्व आमदारांशी चर्चा करुन झाली आहे. तसेच आमदार कुलदीप सिंह वैद यांनी म्हटलं आहे की, पंजाब काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. सोनीया गांधी यांनी निर्णय दिल्यानंतर लगेच सर्व आमदारांची बैठक घेऊन एकमताने निर्णय घेण्यात येईल.


हेही वाचा : नवज्योतसिंग सिद्धूंची पाकिस्तानशी मैत्री घातक ठरेल, अमरिंदर सिंगांचा सिद्धूंच्या नावाला विरोध


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -