घरताज्या घडामोडीCM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी...

CM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा, २५ हजार सरकारी पदांची भरती होणार

Subscribe

पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मंत्र्यांच्या शपथविधीनंतर पहिली बैठक पार पडली. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एकूण २८ हजार सरकारी पदांवर भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतला आहे. यामध्ये १० हजार नोकऱ्या पोलीस विभागात असतील तर बाकी १५ हजार नोकऱ्या दुसऱ्या विभागातील असतील. तसेच या पदांवर एका महिन्यात भरती होणार आहे. भगवंत मान यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार असे आश्वासन दिले होते.

पंजाबमध्ये आपचे सरकार आले असून मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. दोन नवीन चेहऱ्यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. तीन दिवसांपुर्वी भगवंत सिंग यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील ८ मंत्री पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. या सगळ्यांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली आहे. हरपाल सिंग चीमा आणि गुरमीत सिंग मीत हेयर यांना सोडल्यास बाकी सगळे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर रविवारी पहिलीच मंत्रिमंडळ बैठक बोलवली होती. पहिल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. एकूण २५ हजार सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे भगवंत मान यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांचे सरकार पहिला अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करणार आहे.

- Advertisement -

दीर्बाचे आमदार चीमा यांनी पहिली शपथ घतेली. यानंतर मंत्रिमंडळातील एक महिला आणि मालोटचे आमदार डॉ. बलजीत कौर यांनी शपथ घेतली. यानंतर जंडियालातून हरभजन सिंग, विजय सिंगला, लाल चंदल, गुरमीत सिंग मीत हेयर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, होशियारपुमधून ब्रम्ह शंकर जिंपा आणि हरजोत सिंग बैंस यांनी मंत्रीपदासाठी शपथ घेतली.


हेही वाचा : Punjab Cabinet Expansion : वकील, डॉक्टर, इंजिनिअर अन् शेतकरी, भगवंत मान यांच्या कॅबिनेटमध्ये कोणाचा समावेश ?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -