घरताज्या घडामोडीभ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणार, मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी...

भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविरोधात तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करणार, मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आपने सत्तेवर येताच भगवंत मान यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये २३ मार्च रोजी शहीद दिवसाच्या निमित्ताने भ्रष्टाचार विरोधी हेल्पालाईन क्रमांक जारी करणार असल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. या हेल्पलाईनमध्ये माझा देखील मोबाईल क्रमांक असणार असल्याचं देखील मान यांनी स्पष्ट केलं आहे. पंजाबमध्ये जर कोणीही लाच मागितली तर त्यांना देऊ नका, त्यांचा व्हिडिओ बनवून मला पाठवा. माझं कार्यालय त्या प्रकरणाची चौकशी करेल, असं भगवंत मान म्हणाले.

- Advertisement -

भगवंत मान यांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे पाऊल पंजाब राज्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. दिल्लीप्रमाणे आम आदमी पार्टीचं पंजाबमधील सरकार भ्रष्टाचारविरोधीत महत्त्वाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. मान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पहिल्या बैठकीला संबोधित केलं. यासंदर्भात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. राज्यातील पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत लोकसेवकाप्रमाणं वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, भगवंत मान यांनी हा निर्णय घेतल्यानंतर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या निर्णयाच स्वागत केलं. भ्रष्टाचार आज एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यासंदर्भात आपने आश्वासनं दिलं होतं. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील आप सरकारच्या निर्णयाचं अभिनंदन केलं आहे.

- Advertisement -

पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकणारे आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी बुधवारीच राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मान यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.


हेही वाचा : Indian Economy : रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या विकासदरात घट होण्याची शक्यता, मूडीजने वर्तवला अंदाज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -