घरताज्या घडामोडीपंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी, थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे तक्रार करता येणार

पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी, थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे तक्रार करता येणार

Subscribe

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुसरी घोषणा केली आहे. पहिल्या राज्यमंत्रिमंडळात पदभरतीची घोषणा केल्यानंतर आता भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी केली आहे. यासाठी एक नंबर जारी करण्यात आला असून त्या नंबरवर व्हॉट्सअॅप करुन तक्रार करता येणार आहे. थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे तक्रार जाईल. मुख्यमंत्र्यांकडून 9501 200 200 हा मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे. शहीद भगतसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर या हेल्पलाईनची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आज आम्ही भ्रष्टाचारविरोधात तक्रार करण्यासाठी फोन नंबर जारी करत आहोत. 9501 200 200 हा भ्रष्टाचारविरोधातील नंबर आहे. जर कोणी कामाच्या मोबदल्यात पैसे, लाच मागितल्यास विरोध करु नका, त्याचे चित्रण करुन आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्हाला माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यात येईल. पंजाबच्या लोकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी १७ मार्चला जाहीर केले होते की, त्यांचे सरकार २३ मार्चला राज्यात भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी करणार आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मोहिम हाती घेतली आहे. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री मान म्हणाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सीएम भगवंत मान यांच्या घोषणेचे स्वागत केले होते. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही राष्ट्रीय राजधानीत भ्रष्टाचाराची सफाई केली आहे. आता मान पंजाबमध्ये ईमानदारीने काम करतील.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं आहे की, जेव्हा आम आदमी पार्टी सत्तेत आली तेव्हा लोकांना भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन केले होते. दिल्लीत अशा प्रकारे भ्रष्टाचाराची सफाई करण्यात आली आहे. तसेच आमचे सरकार पंजाबमध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करेल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. आमचे सरकार भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून टाकेल. राज्यातील लोकांना अधिक त्रास होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राज्यातील भ्रष्ट व्यवस्थेसाठी आधीच्या सरकारांना जबाबदार धरून मुख्यमंत्री मान म्हणाले, “आप सरकारच भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करू शकते.” इतर पक्षांनी ही व्यवस्था कुजवली आहे. वरपासून खालपर्यंत त्यांच्या नेत्यांना अधिकाऱ्यांना ठेवून भ्रष्टाचार करण्यात येत होता. आपला अशा पैशांची गरज नाही आहे.


हेही वाचा : Dhami Cabinet 2.0 : सीएम पुष्कर सिंह धामी यांच्यासह ‘या’ 8 मंत्र्यांनी घेतली शपथ; पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -