CM Bhagwant Mann: भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी आपले आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय सिंगला (health minister Vijay Singla) कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर मान यांनी सिंगला यांना मंत्रिपदावरून हटवलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी मॉडेल अंतर्गत, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठी कारवाई केली आणि त्यांच्या मंत्र्यांची हकालपट्टी केली. पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांच्याविरूद्ध भ्रष्टाचारात गुंतल्याचे पुरावे सापडल्याचे सांगितले जात आहेत.

आरोग्यमंत्री विजय सिंगला हे कंत्राटी अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी करत होते. तक्रार आल्यानंतर मान यांनी त्यांनी बडतर्फ केले. देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांची थेट आपल्या मंत्र्यावर कडक कारवाई केली आहे. लोकांनी खूप अपेक्षा ठेवून आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले आहे, त्या अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे, असं भगवंत मान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या एका मंत्र्याची भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हकालपट्टी केली होती. आज देशात दुसऱ्यांदा असे घडत आहे. विजय सिंगला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्या आहेत.


हेही वाचा :पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी, थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे तक्रार करता येणार