घरताज्या घडामोडीPunjab CM : चरणजीत सिंह चन्नींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, दोन नेत्यांची मंत्रीपदासाठी...

Punjab CM : चरणजीत सिंह चन्नींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, दोन नेत्यांची मंत्रीपदासाठी शपथ

Subscribe

पंजाब काँग्रेसकडून दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंजाब काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा रविवारी करण्यात आली होती. काँगेस नेते चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. चन्नी यांनी राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. चन्नी यांच्यासोबत काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओमप्रकाश सोनी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंजाब काँग्रेसकडून दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांना हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. शपथविधीच्या वेळी काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधीही राजभवनावर उपस्थित होते.

चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांच्या उपस्थितीमध्ये राजभवन येथे ११ वाजता शपथविधी आयोजित करण्यात आला होता. चरणजीत सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या यांच्या शपथविधीनंतर काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी राजभवनवर पोहचले. राहुल गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. चरणजीत चन्नी हे पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री झाले आहेत.

- Advertisement -

चरणजीत चन्नी यांना संधी का?

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दलित समुदायातून येतात. पंजाबमधील दलित समुदायाला काँग्रेसकडे वळवण्यासाठी चन्नी यांचा फायदा होऊ शकतो. दलित समुदायाचा चन्नी यांना मोठा पाठिंबा आहे. शीख आणि हिंदुंचा समुदायाला मोठा पाठिंबा आहे. पंजाबमध्ये रविदासी आणि वाल्मिकी हे दोन मोठे समुदाय आहेत. ग्रामीण क्षेत्रातील हे समुदाय निवडणुकीत मोठी भूमिका बजावतात यामुळे चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यामुळे ग्रामीण भागात चांगला जनाधार मिळू शकतो.

- Advertisement -

सुनील जाखड नाराज?

चरणजीत सिंह चन्नी यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुका या काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाती असे वक्तव्य काँग्रेस नेते हरीश रावत यांनी केलं आहे. यावर काँग्रेस नेते सुनिल जाखड यांनी प्रतिक्रिया देत नाराजी दर्शवली आहे. हरीश रावत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांचे अधिकार क्षेत्रावर गदा आणण्यासारखे आहे. असे वक्तव्य करत रावत यांनी नाराजी दर्शवली आहे.


हेही वाचा :  Punjab New CM: चरणजित चन्नींचा कौन्सिलर ते मुख्यमंत्रीपर्यंतचा राजकीय प्रवास


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -