घरदेश-विदेशशिक्षकांनी विद्यार्थिनींना केलं विवस्त्र

शिक्षकांनी विद्यार्थिनींना केलं विवस्त्र

Subscribe

शौचालयामध्ये सॅनिटरी पॅडस सापडल्यानंतर चौकशीसाठी काही शिक्षकांनी मुलींची झडती घेतली. त्यावेळी त्यांना कपडे काढायला सांगितले. सॅनिटरी पॅडच्या चौकशीसाठी शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये समोर आला आहे.

सॅनिटरी पॅडच्या चौकशीसाठी शिक्षकांनी विद्यार्थिनींना कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये समोर आला आहे. या साऱ्या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे. फाजिल्का जिल्ह्यातील सरकारी शाळेमध्ये टॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅडस सापडल्यानंतर चौकशीसाठी शिक्षकांनी काही विद्यार्थिनींना कपडे काढायला लावले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिक्षकांविरोधात संतापाची लाट उसळली. हा व्हिडीओ धक्कादायक असा असून मुली रडताना दिसत आहेत. शिवाय, कुंडल गावातील शाळेतील शिक्षिकांनी त्यांना कपडे काढायला लावल्याची तक्रार या मुली करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. याची दखल मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली आहे. त्यानंतर दोन शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, या प्रकरणाची सखोल चौकशी करा असे आदेश देखील मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. शौचालयामध्ये सॅनिटरी पॅडस सापडल्यानंतर चौकशीसाठी काही शिक्षकांनी मुलींची झडती घेतली. त्यावेळी त्यांना कपडे काढायला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -