Punjab Congress crisis : नवज्योतसिंग सिद्धूंची पाकिस्तानशी मैत्री घातक ठरेल, अमरिंदर सिंगांचा सिद्धूंच्या नावाला विरोध

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धु यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विरोध केला

Punjab Congress crisis Amarinder Singh opposes Sidhu's name to next cm of punjab
Punjab Congress crisis : नवज्योतसिंग सिद्धूंची पाकिस्तानशी मैत्री घातक ठरेल, अमरिंदर सिंगांचा सिद्धूंच्या नावाला विरोध

कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh ) यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अमरिंदर यांच्यानंतर आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरु आहे. (Punjab Congress crisis) यामध्ये काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धु यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विरोध केला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तानशी चांगले मैत्री संबंध आहेत. पाकिस्तानचे बाजवा यांच्याशी घनिष्ठ मैत्री सिद्धूंची आहे. यामुळे जर नवज्योतसिंग सिद्धू जर पंजाबचे मुख्यमंत्री झाले तर पंजाबसाठी धोकादायक असल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. अमरिंदर सिंग यांनी शनिवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर अमरिंद सिंग यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धूंच्या नावाला आपला विरोध असल्याचे सांगितले आहे. नवज्योतसिंग सिद्धू जर मुख्यमंत्री झाले तर पंजाबच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल. सिद्धूंचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. सिद्धू मुख्यमंत्रीपदाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळू शकत नाहीत. मी त्यांना ओळखून असल्याचे अमरिंदरसिंग यांनी म्हटलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की,”जर नवज्योत सिंग सिद्धूंना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर त्याला विरोध करण्यात येईल. कारण नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम आपल्या सर्वांनाच भारी पडण्याची शक्यता आहे. याहून मोठी गोष्ट ही आहे की, जेव्हा नवज्योत सिंग सिद्धू मंत्री होते तेव्हा त्यांनी एकही फाईल उघडून बघितली नव्हती” असे वक्तव्य अमरिंदर सिंग यांनी केलं आहे.

राजीनामा दिल्यावर अमरिंदर सिंग काय म्हणाले?

अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे की, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन महिन्यांत ३ वेळा आमदारांना दिल्लीत बोलावून बैठक घेतली होती. अपमान सहन झाला नसल्याचेही अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता हायकमांडचा, सोनिया गांधींचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना मुख्यमंत्री करावं, ते तुमचा विश्वास सार्थकी लावतील. तसेच आता माझ्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत. मला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक घेऊन पुढील रणनिती ठरवण्यात येईल असे अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.