रोडरेज प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंची तब्येत बिघडली

सोमवारी सकाळी ९ वाजता पोलीस संरक्षणातून नवज्योत सिंह सिंधू यांना रुग्णालयाच्या हेप्टोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं होतं.

पटियालाच्या सेंट्रल तुरुंगात (Central Jail Patiyala) शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेता आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांची तब्येत आज सकाळी अचानक बिघडली. तब्येत खालावल्याने त्यांना पीजीआय चंदीगढ (PGI Chandigrah) येथे उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी ९ वाजता पोलीस संरक्षणातून नवज्योत सिंह सिंधू यांना रुग्णालयाच्या हेप्टोलॉजी विभागात (Heptology Department) दाखल करण्यात आलं होतं. यकृतासंबंधित (Liver) आजार असल्याने त्यांच्या दोन ते तीन चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर औषधे देऊन डिस्चार्ज (Discharge from hospital) देण्यात आला. जवळपास एक तास ते या रुग्णालयात होते.

पोलिस संरक्षणात जेव्हा नवज्योत सिंह सिद्धू यांना पीजीआय चंदीगढ येथे आणण्यात आलं तेव्हा पंजाब काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आणि त्यांच्या कुटुंबातील लोक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून नवज्योत सिंह सिद्धू यांना यकृतासंबंधित आजार आहे. हा त्रास वाढल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयात आणण्यात आले.

हेही वाचा – नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा सश्रम कारावास

१९८८मधील रस्त्यावरील भांडणातून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्ष सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. २० मेपासून पटियालाच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांच्या शिक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर, २३ मे रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना मेडिकल चेकअपसाठी पटियालाच्या राजिंदराच्या रुग्णालयात आणण्यात आले होते.

दरम्यान, तुरुंगातील जेवण जेवण्यास सिद्धूने नकार दिला होता. त्यांना यकृतासंबंधी आजार असल्याने वजन घटवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तुरुंगातील चपाती ते खाऊ शकत नसल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. चपाती खालल्याने वजून वाढू शकतं, ज्यामुळे ते पुन्हा आजारी पडू शकतात, असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला होता.

हेही वाचा – नवज्योत सिंग सिद्धू यांची पटियाला न्यायालयात शरणागती

डॉक्टरांनी दिलेल्या डायट चाटनुसार त्यांना वजन कमी करण्यास सांगितले आहे. तसेच, रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर, सकाळी औषधी वनस्पतींची रोजमेरीची चहा (Rosemary Tea) आणि रात्री केमोमाईल चहा (Camomile Tea) पिण्याचा सल्ला दिला आहे.