घरदेश-विदेशनवज्योत सिंग सिद्धूंनी आईला रस्त्यावर सोडलं, दिल्ली रेल्वे स्टेशनवर झाला मृत्यू- नवज्योत...

नवज्योत सिंग सिद्धूंनी आईला रस्त्यावर सोडलं, दिल्ली रेल्वे स्टेशनवर झाला मृत्यू- नवज्योत सिंग सिद्धूंच्या बहीणीचा आरोप

Subscribe

सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी पुढे सांगितले की, ती नवज्योत सिंग यांना भेटण्यासाठी अमृतसरच्या घरी गेली होती, मात्र त्यांनी गेट ओपन केले नाही, सिद्धू यांनी त्यांना व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू कौटुंबिक वादात सापडले आहेत. सिद्धू यांची बहिण सुमन तूर हिने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वडील भगवंत सिद्धू यांच्या निधनानंतर सिद्धू यांनीन आई निर्मल भगवंत आणि मोठ्या बहिणीला घरातून हकलून दिल्याचे आरोप बहिण सुमन तूर यांनी केले आहेत. तर यामुळेच दिल्ली रेल्वे स्थानकावर आईचा मृत्यू झाल्याचा दावाही बहिण सुमन यांनी केला आहे.

सिद्धू यांची बहीण सुमन तूर अमेरिकेहून चंदीगडला पोहोचली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी सूमन तूर म्हणाल्या की, नवज्योत सिंग सिद्धू यांनी माझे वडील- आई न्यायिकदृष्ट्या वेगळे झाल्याचे खोटे विधान केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू हे अत्यंक क्रूर आहेत.

- Advertisement -

सिद्धू यांनी बहिणीला व्हॉट्सअॅपवर केले ब्लॉक

सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी पुढे सांगितले की, ती नवज्योत सिंग यांना भेटण्यासाठी अमृतसरच्या घरी गेली होती, मात्र त्यांनी गेट ओपन केले नाही, सिद्धू यांनी त्यांना व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले. 1986 मध्ये वडील भगवंत सिद्धू यांचे निधन झाले यानंतर लगेचच सिद्धू यांनी आपल्या आईला घराबाहेर काढले. असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

सुमन यांनी सांगितले की, तिच्या आईने तिची प्रतिमा वाचवण्यासाठी दिल्लीत फेऱ्या मारल्या आणि शेवटी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिचा मृत्यू झाला. सिद्धू यांनी हे सर्व संपत्तीसाठी केल्याचे आरोप सुमन तूर यांनी केले आहे. सुमन तूर पुढे म्हणाल्या की, त्या 1990 मध्ये अमेरिकेत गेली होती. यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची आई निर्मल महाजन उर्फ निर्मल भगवंत यांच्यासोबत खूप क्रूरपणे वागून अत्याचार केले. यादरम्यान तिने भाऊ नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण सिद्धू यांनी घरात येण्यास परवानगी दिली नाही. यावेळी सिद्धू यांची पत्नीही त्यांच्या मदतीला धावून आली. सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर म्हणाल्या की, सिद्धू यांचे वडील भगवंत सिंग यांनी दोन लग्न केले होते. सिद्धूच्या दोन बहिणी या वडिलांच्या पहिल्या लग्नापासून आहेत.


आता Ration Card वर मिळणार स्वस्तात पेट्रोल! ‘या’ लोकांना होणार फायदा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -