punjab election 2022-पंजाबमध्ये आपच्या विजयामागे खलिस्तानचं फंडींग- शीख फॉर जस्टीसचा आरोप

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. आपच्या झाडूने काँग्रेसच नाही तर भाजपसह अन्य पक्षांचाही सुपडा साफ केला आहे. यामुळे पंजाबमध्ये आपचे कार्यकर्ते आनंदोत्स्व साजरा करत आहेत. याचदरम्यान, शीख ऑफ जस्टीसने आपच्या या विजयामागे खलिस्तान असल्याचा आरोप करत खळबळ उडवली आहे. यासंदर्भात आपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार भगवंत मान यांना शिख फॉर जस्टीसने पत्र लिहले आहे.

या पत्रात तुमच्या आप पक्षाने कुठल्याही प्रचार आणि कॅडरशिवाय ७० टकके जागा जिंकल्या. त्यामागे खलिस्तानी समर्थकांचे फडींग असल्याचा थेट आरोपच शीख ऑफ जस्टीसने केला आहे. तसेच शीख ऑफ जस्टीस नावाने खोटी पत्र दाखवत आपने मत मिळवल्याचेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी शीख फॉर जस्टीसने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे खलिस्तानचे समर्थन करत असल्याचा लेटर बॉम्ब फोडला होता.