घरताज्या घडामोडीCorona Virus: कोरोनाच्या निर्बंधात तात्काळ शिथिलता करण्याबाबत पंजाब सरकारचा मोठा निर्णय

Corona Virus: कोरोनाच्या निर्बंधात तात्काळ शिथिलता करण्याबाबत पंजाब सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

देशातील कोरोना विषाणूची स्थिती पाहिली असता बहुतांश राज्यांनी कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबत पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पंजाब सरकारच्या गृह खात्याने परिपत्रक जारी केलं असून कोरोनामुळे राज्यातील जनतेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध तात्काळ हटविण्याचे निर्देश गृह खात्याचे सचिव अनुराग वर्मा यांनी दिले आहेत. गृह खात्याने यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि सर्वच झोनल आयजीपींना पत्र लिहून तात्काळ यासंदर्भात कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

कोरोना महामारीच्या अनुषंगाने कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन २००५ अन्वये लादण्यात आलेले सर्व कमी करण्यात यावेत, असे परिपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे येथे लवकरच आप पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. भगवंत मान हे आप पक्षाचे पंजाबमधील पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मान यांनी सोमवारी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते १६ मार्चला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आपने ११७ जागांवर निवडणूक लढवली होती. ११७ पैकी ९२ जागांवर आप पक्षाने मुसंडी मारली आहे.


हेही वाचा : पुढच्या वर्षी खेळाडू आयपीएल नाही, तर PSL खेळतील, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -