घरताज्या घडामोडीपंजाबमध्ये आयएसआयने स्थापन केली 'लश्कर ए खालसा' संघटना

पंजाबमध्ये आयएसआयने स्थापन केली ‘लश्कर ए खालसा’ संघटना

Subscribe

पंजाबमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने ISI लश्कर ए खालसा नावाची दहशतवादी संघटना बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबमधील मोहाली येथे सोमवारी इंटेलिजन्स बिल्डींगमध्ये स्फोट झाल्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान, पंजाबमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने ISI लश्कर ए खालसा नावाची दहशतवादी संघटना स्थापन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे या संघटनेत सामील होणाऱ्यांना अफगाणि सैनिक प्रशिक्षण देत आहेत. तसेच या संघटनेत अफगाणि दहशतवाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अफगाणि सैनिकांना आरपीजीसह (RPG) इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचा अनुभव असल्याने त्यांना या संघटनेत सामील करण्यात आले आहे. लश्कर ए खालसाच्या द्वारे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा डाव आयएसआयने रचला आहे. तसेच या संघटनेत पंजाब-हरयाणातील स्थानिक गँगस्टर आणि गुन्हेगारांचाही समावेश आहे. यासाठी या गुन्हेगारांना ड्रग्जच्या विक्रीतून अमाप पैसा कसा मिळवता येऊ शकतो याचे आमिष दाखवण्यात येत आहे.

- Advertisement -

मोहालीतील घटनेमागे आयएसआयच्या पंजाबमधील K-2 (Kashmir-khalistan )वर संशय व्यक्त करण्यात येत आहे. केंद्राच्या गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने याबाबत खुलासा केला आहे. तसेच एनआयएनेही पंजाबमध्ये सध्या सुरू असलेल्या टार्गेट किलिंगवर खुलासा केला आहे.

पंजाब मोहालीमध्ये सोमवारी संध्याकाळी उशीरा पोलीस इंटलेजिन्स बिल्डींगमध्ये स्फोट झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यानुसार स्फोट होण्याच्या काही वेळ आधी या बिल्डिंगजवळ एका कारमध्ये दोन संशयित दिसले होते. त्यांनी ८० मीटर अंतरावरून रॉकेट लॉंचरचा वापर करत बिल्डिंगवर ग्रेनेड डागले होते. या स्फोटामुळे पंजाबमध्ये तणावाचे वातावरण आहे. तसेच आता यामागे आयएसआयच्या लश्कर ए खालसा या नवीन संघटनेचा हात असल्याचे समोर आल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -