घरताज्या घडामोडीMASKS MANDATORY IN PUNJAB : दिल्लीपाठोपाठ आता पंजाबमध्येही मास्क अनिवार्य, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...

MASKS MANDATORY IN PUNJAB : दिल्लीपाठोपाठ आता पंजाबमध्येही मास्क अनिवार्य, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

देशात कोरोना संसर्गाचा विस्फोट होण्यास पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. दिल्लीपाठोपाठ आता पंजाबमध्येही मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोविड -१९ शी संबंधित निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा एकदा जारी करण्यात येणार आहेत.

पंजाब सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisement -

पंजाब सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, बस, ट्रेन, विमान, टॅक्सी इत्यादी सार्वजनिक वाहतुकींमध्ये मास्क लावण्याची सक्ती केली आहे. तसेच सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, शाळा-महाविद्यालये, कार्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राजधानी दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहे. दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

देशातील इतर राज्यांसह पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मागील २४ तासात १५ नवीन रुग्ण आढळले असून पंजाबमधील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९० वर पोहोचली आहे. संसर्गाचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. मंगळवारी पंजाबमध्ये कोरोनाचा संसर्ग दर ०.३३ टक्के नोंदवला गेला होता.


हेही वाचा : Corona Virus : दिल्लीत पुन्हा मास्क अनिवार्य, मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -