Blast In Mohali : पंजाबमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भीषण स्फोट, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

पंजाबमध्ये मागील दोन दिवसांपासून भीषण स्फोट होत असल्याची माहिती समोर येत आहे. पंजाबच्या मोहालीमधील गुप्तचर विभागाच्या इमारतीसमोर सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या २४ तासांत दोन वेळा स्फोट झाल्यामुळे चिंता अधिक प्रमाणात वाढली आहे.

मोहालीमध्ये काल सोमवारी रात्री गुप्तचर विभागाच्या इमारतीत मोठा स्फोट झाला होता. रॉकेटसदृश्य वस्तू पडल्यानंतर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या इमारतीवर रॉकेटने हल्ला करण्यात आला. ज्याने सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. गुप्तचर विभागाची ही इमारत सुहाना साहिब गुरुद्वाराजवळ आहे. दरम्यान, या स्फोटाचा तपास सुरू असतानाच आज पुन्हा गुप्तचर विभागाच्या इमारतीसमोर हा दुसरा स्फोट झाला आहे.


हेही वाचा : मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाबाहेर मोठा स्फोट