Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका; पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा

शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका; पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा

Related Story

- Advertisement -

कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसला आहे. पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला आठ नगरपालिका, १०९ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून भाजपला मोठा फटका बसला आहे. तर काँग्रेसने ७ नगरपालिकांवर कब्जा मिळविला आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पंजाबमधील निवडणुकांमध्ये बसणार का? अशी चर्चा सुरु होती.

गेले दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. याचा फटका भाजपला पंजाबमध्ये बसला आहे. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजपला खातं देखील उघडता आलेलं नाही. भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्व २९ जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

यावेळी भाजप स्वबळावर

- Advertisement -

या निवडणुकीत आम आदमी पक्षाने १३ जागा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. एनडीएमधील सर्वात जुने मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाशिवाय भाजप दोन दशकांत प्रथमच निवडणूक लढवित आहे. अकाली दलाने कृषी कायद्यांवरून भाजपसोबतची युती तोडली. त्यामुळे भाजपला यावेळेस एकट्याने निवडणूक लढवावी लागली.

काँग्रेससाठी ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची उपांत्य फेरी

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही उपांत्य फेरी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

- Advertisement -