घरताज्या घडामोडीPunjab New CM Bhagwant Mann: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी केजरीवालांसाठी...

Punjab New CM Bhagwant Mann: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी केजरीवालांसाठी वाजवल्या टाळ्या

Subscribe

आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. भगवंत मान पंजाबचे १७वे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा भगत सिंग यांच्या मूळ गावी खटकर कलांमध्ये पार पडला. या सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह दिल्ली आपचे सर्व नेते उपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केले. एवढे नाही तर मान यांनी लोकांकडून केजरीवाल यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले.

भगवंत मान म्हणाले की, ‘मी केजरीवाल यांचे विशेष आभार मानतो. ज्यांनी २०-२० दिवस उपोषण केले, आंदोलन केले आणि पक्ष बनवला. संपूर्ण देशातील राजकारणात सुधारणा केली. माझी इच्छा आहे की, सर्वांनी पुन्हा एकदा यासाठी टाळ्या वाजवा. त्यानंतर सर्व लोकांनी केजरीवाल यांच्यासाठी टाळ्या वाजवला.’

- Advertisement -

पुढे मान म्हणाले की, ‘पंजाबचे कोण-कोण लोकं भगत सिंग यांच्या खटकर कलां गावी आले आहेत. मी या लोकांचे मनापासून आभार मानतो. दिल्लीचे मंत्रिमंडळ येथे बसले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री आले आहेत. येथे पंजाबचे आमदार बसले आहेत, ज्यांनी विजय मिळवला. या सर्वांचे आभार मानतो. पहिल्यांदा शपथविधी सोहळा स्टेडियम आणि इतर ठिकाणी होत होता. परंतु मी विचार केला शहिदांचे स्मरण करूया. त्यामुळे हे गाव शपथविधी सोहळ्यासाठी निवडले. हे भगत सिंग यांचे गाव आहे. आम आदमी पार्टी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. हे गाव माझ्यासाठी नवे नाही. मी येथे खूप वेळा आलो आहे. जनतेला आपली साथ दिली आहे. जनतेचे असे प्रेम मिळवण्यास अनेक वेळा जन्म घ्यावे लागेल.’


हेही वाचा – Bhagwant Mann Oath यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; केजरीवालांची कार्यक्रमाला उपस्थिती

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -