गायक सिद्धू मूसेवाल हत्ये प्रकरणी 6 जणांना पंजब पोलीसांच्या ताब्यात

Punjab police arrest 6 in Sidhu murder case
गायक सिद्धू मूसेवाल हत्येप्रकरणी 6 जण पंजाब पोलिसांच्या ताब्यात

गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत मदत करणाऱ्यांना डेहराडून, उत्तराखंडमध्ये पकडण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांपैकी एकाचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला उत्तराखंड स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने पकडण्यात आले. अटक करण्यात आलेले लोक लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असून त्यांना डेहराडूनमधील नया गाव चौकी येथे पकडण्यात आले. पंजाब पोलीस एकूण 6 जणांसह रवाना झाले आहेत.

गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत मदत करणाऱ्यांना डेहराडूनमधील उत्तराखंडमध्ये पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचा या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. पंजाब पोलिसांना होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला उत्तराखंड स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने पकडण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले लोक लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य असून त्यांना डेहराडूनमधील नया गाव चौकी येथे पकडण्यात आले.

संशयिताला पोलीसांनी घेतले ताब्यात –

या हत्येमध्ये एकाचा सहभाग असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये तो लपला होता. पंजाब आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला ताब्यात घेतले. संशयिताला आता पंजाबला नेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. डेहराडूनमधून ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. या टोळीने गायक मूस वाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या आणखी पाच संशयितांनाही पंजाबमध्ये नेले जात आहे.

काय घडले – 

सिद्धू मूसेवाला यांची काल पंजाबमधील मानसा येथे एसयूव्हीमध्ये प्रवास करत असताना गोळ्या झाडण्यात आल्या. गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलने 30 गोळ्या झाडण्यात आल्या. मूसेवाला यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती.

पोलीसांचा अंदाज –

पंजाबचे पोलीस प्रमुख व्ही.के.भावरा यांनी ही हत्या परस्पर वैमनस्यातून झाल्याचे दिसते. ही घटना टोळीयुद्धातील असल्याचे दिसते, असे पत्रकारांना सांगितले. गायक मूसेवालाची मॅनेजर शगुनप्रीतचे नाव गेल्या वर्षी तरुण अकाली नेता विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येप्रकरणी आले होते. यानंतर शगुनप्रीत ऑस्ट्रेलियाला पळून गेली होती. पोलीस प्रमुखांनी सांगितले की, मिद्दुखेडा येथील हत्येचा सूड म्हणून सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आल्याचे दिसते.