घरदेश-विदेशCorona: लॉकडाऊनमध्ये घेतला क्लास; विद्यार्थ्यांची थेट पोलिसात तक्रार!

Corona: लॉकडाऊनमध्ये घेतला क्लास; विद्यार्थ्यांची थेट पोलिसात तक्रार!

Subscribe

लॉकडाऊन असताना देखील एका शिक्षकाने आपला क्लास सुरू ठेवला होता. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांत याची तक्रार दाखल करून पोलिसांना याची खबर दिली

पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात एक चकित करणारी घटना उघडकीस आली आहे. पंजाबमध्ये एका व्यक्तीला लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करताना पकडले. लॉकडाऊन असताना देखील एका शिक्षकाने आपला क्लास सुरू ठेवला होता. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांत याची तक्रार दाखल करून पोलिसांना याची खबर दिली. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी क्लासमधून परत आणले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलांकडे चौकशी केली असता पाच वर्षाच्या मुलाने क्लासच्या शिक्षकाचा पत्ता देखील पोलिसांना दिला.

मुलाकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिस उपअधीक्षक गुरदीपसिंग यांनी लॉकडाऊनदरम्यान शिक्षकाने विद्यार्थ्यांचे क्लास सुरू ठेवले असल्याने चांगलेच खडसवले. यासह दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील सध्या सुरू असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. शनिवारी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला शहरातील व्यक्तीला पकडल्यानंतर पोलिसांनी जाब विचारला, ‘लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातच राहायला सांगितले जात असताना शाळा बंद असूनही तुम्ही मुलांना क्लाससाठी का पाठवत आहात? तसेच पोलीस असेही म्हणाले, “आम्ही कोरोना व्हायरसमुळे लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करतोय आणि तुम्ही देशातील परिस्थिती बघत असताना मुलांना क्लाससाठी पाठवत आहात!”

- Advertisement -

दरम्यान या घटनेची चौकशी करताना मुलांनी शिक्षकाचे नाव सांगून त्यांच्या घरचा पत्ता देखील दिला. यावेळी पोलीस थेट शिक्षकांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी शिक्षकाला क्लास सुरू ठेवण्याची परवानगी कोणी दिली? असे देखील विचारले. मात्र शिक्षकाने कोणतेही उत्तर न दिल्याने अखेर माफी मागत पुन्हा लॉकडाऊन संपेपर्यंत मुलांचा क्लास घेणार नाही असे देखील सांगितले.


Lockdown: घरी पोहोचण्यासाठी तरूणाची १७०० किमी सायकलवारी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -