Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या, पंजाब सरकारने काढली होती सुरक्षा

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या, पंजाब सरकारने काढली होती सुरक्षा

Subscribe

पंजाबचा प्रसिद्धा गायक सिद्धू मूसेवालाची दिवसा ढवळ्या गोळी मारुन हत्या केली आहे. मूसेवालावर मनसा येथील जवाहर गावाजवळ गोळीबार करण्यात आला होता. यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू त्याचा मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारने मूसेवालाची एक दिवसापूर्वीच सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला यामध्ये मूसेवालचा मृत्यू झाला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याला गुंडांकडून धमकी देण्यात आली होती. त्याला पंजाब सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. परंतु आम आदमी पार्टी सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हावाला देत एक दिवसापूर्वीच मूसेवालासह ४२४ व्हिआयपी लोकांची सुरक्षा काढून घेतली आहे. मूसेवाला याने पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आपच्या विजय सिंगल यांच्याविरोधात निवडणूक जिंकली होती. विजय सिंगलाने मूसेवाला याला मनसाच्या जागेवर ६३ हजार ३२३ मतांनी पराभूत केलं होते.

- Advertisement -

गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यासह अन्य दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये सिद्धू मूसेवालाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर अन्य दोन जखमींना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे.

कोण हाता सिद्धू मूसेवाला

- Advertisement -

शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला मनसा जिल्ह्यातील मूसावाला गावचा रहिवाशी आहे. मूसेवालाची लाखो चाहते आहेत. आपल्या गँगस्टर रॅपमुळे तो लोकप्रिय आहे. मूसेवालाची आई सरपंच आहे. तर सिद्धूने इलेक्ट्रिक इंजीनियरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन दिवसामध्ये म्यूजिक शिकण्यासाठी तो कॅनडामध्ये गेला होता. मूसेवाला पंजाबमध्ये वादग्रस्त गायकांपैकी एक होता. तो नेहमी बंदूक संस्कृतिला प्रोत्साहन देत होता. त्याचे अनेक गाणे गँगस्टर संबंधित आहेत.


हेही वाचा : Edava Basheer Dies : पार्श्वगायक एदवा बशीर यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -