घरट्रेंडिंगआता शुद्ध हवा देखील विकत मिळणार! वाचा काय आहे किंमत!

आता शुद्ध हवा देखील विकत मिळणार! वाचा काय आहे किंमत!

Subscribe

खरंतर आत्तापर्यंत अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी, प्रशासनाने, सरकारने, शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी पृथ्वीवरच्या हवेचा दर्जा खालावत असल्याचं पोटतिडकीने सांगितलं आहे. पण आता दिल्लीतली परिस्थिती आणि या शुद्ध हवा विकणाऱ्या प्रॉडक्टच्या पार्श्वभूमीवर अवघ्या जगानेच हा धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

कदाचित बातमीच्या शीर्षकामध्ये नमूद केलेलं भीषण वास्तव आपल्याला अतिशयोक्ती वाटू शकतं. कदाचित भविष्यात असं काही घडू शकेल, असा अंदाज वर्तवलाय की काय, असं देखील तुम्हाला वाटू शकतं. कदाचित शास्त्रज्ञांनी आणि पर्यावरणवाद्यांनी देखील इतक्या लवकर ही परिस्थिती ओढवेल असा अंदाज लावला नसेल. पण हा अंदाज आता वास्तवात उतरला आहे. आणि २०१८मध्येच शुद्ध हवा विकत मिळू लागली आहे. नव्हे, शुद्ध हवा विकली जाऊ लागली आहे. काही परदेशी कंपन्या आणि भारतीय कंपन्यांनी देखील त्यांचे शुद्ध हवेचे प्रॉडक्ट लाँच केले आहेत. आणि ते सामान्यांच्या आवाक्याच्या काय, विचारांच्याच पलीकडले आहेत. ही जितकी आश्चर्याची बाब आहे, तितकाच तो गंभीर इशारा देखील आहे!

दिल्लीतल्या भीषण परिस्थितीवर उत्तर?

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत शुद्ध हवा ही एकमेव गोष्ट होती जी आपल्याला फुकट मिळत होती. पण त्याचं गांभीर्य किंवा महत्त्व आपल्याला न राहिल्यामुळे आता ती शेवटची फुकट मिळणारी गोष्ट देखील विकत घेण्याची पाळी आपल्यावर ओढवली आहे. आणि त्याचं सार्थ उदाहरण म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये सातत्याने घटत जाणारा हवेचा दर्जा. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या हवेचा दर्जा घटत होता. या वर्षी अखेर दिल्लीतल्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळेच विकतच्या शुद्ध हवेचा पर्याय उभा राहिला आहे.

- Advertisement -

‘तो’ व्हिडिओ सत्यात उतरला!

२०१६मध्ये गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात GAIL ने एक मोहीम सुरू केली होती. तेव्हा यूट्यूबवर दिल्लीमध्ये पॅकेट्समध्ये शुद्ध हवा विकण्याची एक कल्पना सादर करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर आधारित ही मोहीम होती. पण आता जेव्हा दिल्लीमध्ये खरंच अशा स्वरूपाच्या हवेची गरज भासत आहे, तेव्हा या व्हिडिओची आठवण कदाचित दिल्लीकरांना होत असेल. कदाचित आत्ता सर्व दिल्लीकरांची एकच मागणी असेल, शुद्ध हवेची!


हेही वाचा – राजधानी दिल्लीत आता इलेक्ट्रिक गाड्यांची धूम!

लिटरमध्ये विकली जातेय शुद्ध हवा!

प्युअर हिमालयन एअर ही भारतीय कंपनी आणि ऑझएअर, व्हायटॅलिटी एअर अशा परदेशी कंपन्यांनी दिल्लीकरांची हीच गरज लक्षात घेऊन शुद्ध हवा विकायला सुरुवात केली आहे. हिमालयातून ही शुद्ध हवा पॅक करून आणल्याचा दावा देखील या कंपन्यांकडून केला जात आहे. एका हवाबंद बाटलीमध्ये ही हवा विकली जात असून लिटरमध्ये तिचे पॅकेट्स उपलब्ध आहेत.

- Advertisement -
Pure Himalayan Air
प्युअर हिमालयन एअर

एका बाटलीची किंमत हजारो रुपये

प्युअर हिमालयन एअर या भारतीय कंपनीने १० लिटर शुद्ध हवेची बाटली लाँच केली असून त्याची किंमत ५५० रुपये आहे. याची सुरुवात कॅनेडियन कंपनी असलेल्या व्हायटॅलिटी एअर कंपनीने केली होती. त्यांच्या वेबसाईटवर या कंपनीने ही शुद्ध हवा विकत उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची ऑझएअर ही कंपनी देखील या कंपन्यांप्रमाणेच शुद्ध हवा विकत असून त्यांच्या ७.५ लिटरच्या बाटलीची किंमत भारतीय चलनामध्ये १ हजार ५०० रुपये इतकी आहे.

एका मिनिटासाठी मोजावे लागतील किमान ५ हजार!

आता सामान्य माणसाचा विचार केला, तर एक माणूस एका मिनिटाला साधारणपणे ८ ते १० लिटर शुद्ध हवा श्वासोच्छवासावाटे घेतो. त्या हिशोबाने एका व्यक्तीला एका तासाला साधारणपणे ५ हजार रुपयांची शुद्ध हवा लागू शकते. आणि दिवसाचं गणित मांडलं, तर हाच आकडा १ लाख २० हजारांच्या घरात जातो. त्यातही हवेची कंपन्यांनुसार प्रतवारी आलीच. आणि प्रतवारीनुसार किंमत बदलली, नव्हे वाढली!

खरंतर आत्तापर्यंत अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी, प्रशासनाने, सरकारने, शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी पृथ्वीवरच्या हवेचा दर्जा खालावत असल्याचं पोटतिडकीने सांगितलं आहे. पण आता दिल्लीतली परिस्थिती आणि या शुद्ध हवा विकणाऱ्या प्रॉडक्टच्या पार्श्वभूमीवर अवघ्या जगानेच हा धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -