घरताज्या घडामोडीPurvanchal expressway : देशात २१ हायवे- एक्सप्रेस वे होणार एअरफोर्सचे रनवे

Purvanchal expressway : देशात २१ हायवे- एक्सप्रेस वे होणार एअरफोर्सचे रनवे

Subscribe

एखाद्या देशावर जेव्हा हल्ला करण्यात येतो तेव्हा शत्रूचे पहिले टार्गेट असते ते म्हणजे त्या देशातील एअऱ फोर्स स्टेशन. त्या एअर फोर्स स्टेशनच्या रनवेलाच शत्रूकडून लक्ष्य करण्यात येते. जेणेकरून एअर फोर्सला कमकुवत करत त्या देशातील फायटर प्लेनचे टेक ऑफ होऊ नये हे टार्गेट शत्रूकडून ठेवण्यात येते. पण शत्रूचे हे मनुसबे लक्षात घेऊनच केंद्र आणि राज्य सरकारकडून आता एक्सप्रेस हायवेवरच २ किलोमीटर ते ३ किलोमीटर रनवे तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना जोडणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेस वे चे सुलतानपुरच्या कूरेभार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या एक्सप्रेस वे च्या निमित्ताने नजीकच्या क्षेत्रात उद्योगांचा विकास, वाणिज्यिक केंद्रे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. पण एअर फोर्सच्या अनुषंगानेच या पूर्वांचलच्या एक्सप्रेस वे ची निर्मिती करण्यात आली आहे. एकट्या पूर्वांचलचा हायवेच नव्हे तर आणखी तीन एक्सप्रेस वे देखील याच उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यात २१ हायवेचा रनवे म्हणून वापर इंडियन एअरफोर्सकडून करण्यात येणार आहे.

देशातील २१ हायवे, एक्सप्रेस वे कम रनवे

देशातील वेगवेगळ्या राज्यात सध्या २१ हायवे आणि एक्सप्रेस वे च्या माध्यमातून फायटर प्लेन आणि ट्रान्सपोर्ट प्लेन लॅण्ड करणे शक्य होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडूनही या हायवेचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करण्यात आले आहे. परिवहन मंत्रालयानेही यासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी काही हायवेच्या बांधणीला परवानगीही मिळाली आहे. ग्रेटर नोएडा ते आगरा दरम्यानचा यमुना एक्सप्रेस वे, आगरा लखनऊ एक्सप्रेस वे याठिकाणी फायटर एअरक्राफ्ट लॅण्डिंगचा सरावही याआधी झाला आहे. आगरा लखनऊ एक्सप्रेस वे वर शक्तीशाली अशा ट्रान्सपोर्ट प्लेन हरक्यूलिसही उतरवण्यात आले होते. त्यामध्येच आता पूर्वांचल एक्सप्रेस वे चाही समावेश होणार आहे. आच या एक्सप्रेस वे वर आगरा लखनऊ एक्सप्रेस वे सारखेच फायटर प्लेन आणि इंडियन एअरफोर्सचे हरक्यूलिस विमानही उतरवण्यात येईल. त्याशिवाय लवकरच दिल्ली ते मुरादाबाद एक्सप्रेस वे चे नावही या यादीत समाविष्ट होणार आहे. मुरादाबाद एक्सप्रेस वे वर विमान लॅण्डिंगसाठी परवानगी मिळाली आहे. जवळपास २१ हायवेचे रूपांतर हे रनवेच्या रूपात करण्यात येईल. या रनवेवर वाहनेही धावतील तसेच गरज पडल्यास विमानेही उतरवण्यात येतील.

- Advertisement -

गरज पडल्यास छत्तीसगढ, ओरिसा, जम्मू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान यासारख्या राज्यातही हायवेचा वापर रनवेसाठी म्हणून करण्याची तयारी सुरू आहे. हायवेवर विमानांचे लॅण्डिंग करण्याचा पर्याय म्हणून काही हायवेची निवड करण्याची तयारी ही एअरफोर्सकडून करण्यात येत आहे.

यूपी एक्सप्रेसवेज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथिरीटीचे सीईओ अवनीश अवस्थी यांनी स्पष्ट केले आहे की पंतप्रधानांच्या जनसभेसोबतच भारतीय वायुसेनेचा मोठा एअर शो पूर्वांचल एक्सप्रेस वे च्या निमित्ताने होणार आहे. या प्रकल्पासाठी एक्सप्रेस वे वर चार्जिंग स्टेशनसाठी निशुल्क जमीन देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस चौकीजवळ हेलिपॅडही विकसित करण्यात येणार आहेत. तसेच सध्या या हायवेसाठी कोणताही टोल आकारण्यात येणार नाही.

- Advertisement -

कसा आहे पूर्वांचल एक्सप्रेस वे

लांबी – ३४०.८२४ किमी
रूंदी – १२० मीटर रूंद
वेग – ताशी १०० किमी (ताशी १२० किमीचे डिझाईन)
रन वे – सुल्तानपुर येथे ३.२० किमी लांब आणि ३४ मीटर रूंद (एअयर स्ट्रिप फायटर जेट विमानांसाठी)
८ ठिकाणी फ्लएल पंप आणि ४ ठिकाणी सीएनजी स्टेशन
८ ठिकाणी प्रसाधनगृह आणि ८ जनसुविधा ठिकाणे
प्रत्येक ५०० मीटर अंतरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग पिटची उभारणी
४.५ लाख रोपांची लागवड
प्रकल्पाचा खर्च २२४९७ कोटी
एकुण खर्च २०४०८ कोटी

पूर्वांचल एक्सप्रेस वे ला वेगळ्या लिंक रोडने आजमगढ ते वाराणसी कनेक्टिव्हिटी मिळणार
गोरखपुर लिंक एक्सप्रेस वे गोरखपुर जिल्हा आजमगढ येथे पूर्वांचल एक्सप्रेस वे सोबत जोडणार
बक्सर गाजीपुर एलिवेटेड रोड पूर्वांचल एक्सप्रेस वे आणि नॅशनल हायवेला बिहारच्या आरा आणि पटनाला जोडला जाणार


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -