Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 'दे धक्का'; बघा व्हिडिओ

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला ‘दे धक्का’; बघा व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

देशातील पश्चिमबंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांसह पद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. आसाम राज्यात तीन टप्प्यात १२६ जागांवर मतदान होणार असून पहिला टप्प्यातील मतदान २७ मार्च, दुसरा टप्प्यातील १ एप्रिल रोजी पार पडलं तर शेवटचं मतदान हे ६ एप्रिल रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाल्याचं दिसत आहे. अशातच आसाममधील जनतेला एक कधी न पाहिलेला दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. हा क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही लोकं एका हेलिकॉप्टरला धक्का देत असल्याचे दिसते.

हे हेलिकॉप्टर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांचं असल्याचे सांगितले जात आहे.या धक्का मारण्यात आलेल्या हेलिकॉप्टरला ज्या हेलिपॅडवर उतरवण्यात आलं होतं. त्याठिकाणी दुसऱ्या एका नेत्यांचे हेलिकॉप्टर उतरवलं जाणार होतं. त्यामुळे एक हेलिकॉप्टर उतरवल्याने दुसऱ्या हेलिकॉप्टर उतरवणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळे हेलिपॅड रिकामं करण्यासाठी काही लोकांना हे हेलिकॉप्टर धक्का मारून बाजूला करण्यात आलं, हा मजेदार प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत असून या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार,कुमार गौरव या युजर्सच्या नावाने ट्विटर वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर या युजर्सने हा व्हिडिओ ट्विट करताना दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरला काही जणांनी धक्का मारून बाजूला केलं. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून चांगल्याच प्रतिक्रिया येत आहेत.

बघा व्हिडिओ

- Advertisement -