Homeदेश-विदेशAllu Arjun : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि काही तासातच...

Allu Arjun : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि काही तासातच जामीन मंजूर

Subscribe

अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्याला न्यायालायने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र यानंतर त्याला काही तासातच जामीन मिळाला आहे.

नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा 2’ हा चित्रपट नुकताच देशभर प्रदर्शित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. मात्र पुष्पा 2 च्या एका प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला ही बातमी कळल्यानंतर त्याने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर केली होती. मात्र आता अल्लू अर्जुनला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालायने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र यानंतर त्याला काही तासातच जामीन मिळाला आहे. (Pushpa 2 starrer South actor superstar Allu Arjun sent to 14 days judicial custody)

अल्लू अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा 2 हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होण्याआधी एका प्रीमियरचे 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या या चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मात्र यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय एम. रेवती या महिलेचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता. तसेच तिचा मुलगाही जखमी झाला होता. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Spy Girls Of 2025: स्पाय युनिव्हर्ससाठी आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी झाल्या सज्ज!

- Advertisement -

अल्लू अर्जुनला सदर बातमी कळल्यानंतर त्याने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र सदर घटनेनंतर 5 डिसेंबर रोजी अभिनेता अल्लू अर्जुन, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि चित्रपट व्यवस्थापनाविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – CID : पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास CID टीम सज्ज

अल्लू अर्जुनला जामून मंजूर

दरम्यान, अल्लू अर्जुनने गुन्हा दाखल केल्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली होती. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आले होते. अशातच आता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु आता अल्लू अर्जुनला जामीन मिळाला आहे.


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -