Putin’s Secret : व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा, रशियाच्या सत्तेवर हुबेहूब दिसणारी व्यक्ती

पुतीन यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यास रशियामध्ये सत्तापालट होईल असे त्यांच्या साथीदारांना वाटत आहे. सत्तापालट झाल्यानंतर रशिया युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवेल.

Russia Ukraine War arrest russian military officer putin will reward you 7.5 crore saus businessman
Putin's Secret : व्लादिमीर पुतीनचा मृत्यू झाल्याचा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा, रशियाच्या सत्तेवर हुबेहूब दिसणारी व्यक्ती

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात आला आहे. रशियाच्या सत्तेवर पुतीन यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती बसली असल्याचा दावा करण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सूरुच आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. या युद्धादरम्यान पुतीन यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. परंतु पुतीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही बातमी कोणाला कळू नये यासाठी त्यांच्या जागी हुबेहूब दिसणारा व्यक्त बसवण्यात आला आहे. असा दावा ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने द डेली स्टारच्या हवालाने केला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे जीवन रहस्यांनी भरलेले आहे. पुतीन यांचे जीवन, आरोग्य आणि रणनीती याविषयी काही मोजक्याच लोकांना माहिती आहे. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी असा आश्चर्यकारक दावा केला आहे. ज्यामुळे जगात खळबळ माजली आहे. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी यापूर्वीसुद्धा पुतीन यांच्याविषयी अनेक दावे केले आहेत. परंतु यावेळी केलेल्या दाव्याने चर्चा सुरु झाली आहे.

ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी एका अहवालात असे म्हटलं आहे की, पुतीन यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याागी बहुरुप्याला बसवण्यात आले आहे. तोच सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत माहिती देताना मध्यमांसमोर आले होते. त्यावेळी त्यांचा चेहरासुद्धा सुजला होता असे सांगितले जात आहे. पुतीन यांना रक्ताचा कर्करोग झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुतीन यांच्या मृत्यूची बातमी रशियाकडून लपवण्यात येत आहे.

सत्य समोर आल्यास सत्तापालट होण्याची शक्यता

पुतीन यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यास रशियामध्ये सत्तापालट होईल असे त्यांच्या साथीदारांना वाटत आहे. सत्तापालट झाल्यानंतर रशिया युक्रेनमधील सैन्य माघारी बोलवेल. पुतीन यांच्या मृत्यूच्या बातमीने सैन्याची ताकद कमी होईल आणि सत्तासुद्धा जाईल त्यामुळे पुतीन यांच्या मृत्यूचे सत्य लपवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.


हेही वाचा : पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या, पंजाब सरकारने काढली होती सुरक्षा